दररोज न चुकता गोमूत्र प्यायचा अक्षय; शेअर केली खास पोस्ट

यामागचं खरं कारण काय?

Updated: Sep 11, 2020, 09:00 AM IST
दररोज न चुकता गोमूत्र प्यायचा अक्षय; शेअर केली खास पोस्ट  title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लोकप्रिय ऍडवेंचर शो 'इन टू द वाइल्ड'मध्ये दिसणार आहे. अक्षयसोबतच या शोचा होस्ट बेअर ग्रिल्सदेखील आपल्याला यामध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षयने या शोबाबत इंस्टाग्रामवर लाईव्ह केलं. 

या लाईव्हमध्ये अक्षयसोबत हुमा कुरैशी आणि बेयर ग्रिल्स देखील होते. या लाईव्ह सेशनच्या दरम्यान हुमाने अक्षयला अनेक प्रश्न विचारले. हुमाने आणखी एक प्रश्न विचारला की, बेयर ग्रिल्सने त्याने हत्तीच्या विष्ठेशी संबंधित पदार्थ खाण्यासाठी कसं तयार केलं?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@beargrylls @iamhumaq @discoveryplusindia @discoverychannelin

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

यावर बोलताना अक्षय म्हणाला की, मी याबाबत कोणताच ताण घेतला नव्हता. कारण आयुर्वेदिक कारणामुळे अनेकदा मी गोमूत्र प्यायलो आहे. यामुळे मला खास त्रास झाला नाही. 

या लाईव्ह दरम्यान अक्षय वेगळ्या लूकमध्ये दिसला. अक्षयने सांगितलं की, नव्या सिनेमाकरता मी मिश्या ठेवल्या होत्या. माझ्याकडे ऑप्शन होतं की, मी या सिनेमाकरता फेक मिशी पण लावू शकत नाही. मात्र मी खऱ्या मिशांचा ऑप्शन निवडला. पण माझ्या कुटुंबियांना हा लूक आवडला नाही. त्यावर बेअरने आपण देखील मिशी वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कुटुंबियांनी ही आयडिया आवडली नाही.