दिवाळीत प्रदर्शित होणार नाही अक्षयचा 'सूर्यवंशी' सिनेमा

या मागचं कारण महत्वाचं 

Updated: Oct 3, 2020, 01:13 PM IST
दिवाळीत प्रदर्शित होणार नाही अक्षयचा 'सूर्यवंशी' सिनेमा title=

मुंबई : अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा सिनेमा दिवाळीपर्यंत प्रदर्शित होणार नाही. ही माहिती स्वतः INOX ने आपल्या ट्विटवरून माहिती दिली आहे. सूर्यवंशी हा सिनेमा दिवाळीपर्यंत प्रदर्शित होणार नाही. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर आता थिएटर सुरू होणार आहेत. पण अक्षयच्या चाहत्यांसाठी मात्र ही महत्वाची बातमी आहे. 

२६ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता रिलीज 

रोहित शेट्टीचा सिनेमा 'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ लीड रोलमध्ये आहे. हा सिनेमा २६ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. याच काळात देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे लॉकडाऊन करण्यात आला आणि सिनेमाघर बंद झाली. ज्यामुळे सूर्यवंशी हा सिनेमा प्रदर्शित झाला नाही. 

दिवाळीतही प्रदर्शित होणार नाही सिनेमा 

रिलायन्स एंटरटेन्मेंटचे सीईओ शिबाशीष सरकारने यामागचं कारण सांगितलं आहे. सरकारने सिनेमाघर खुली करण्यास परवानगी तर दिली आहे. मात्र एवढ्या कमी वेळात हा सिनेमा रिलीज करणं शक्य नाही. यामुळे हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शित होणार नाही.