अक्षय कुमारचा युट्यूबरवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा

अक्षय कुमारने  (Akshay Kumar) एका युट्यूबरवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकलाय. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी अक्षय कुमार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray)  गुपचूप बोलायचे असे राशिद सिद्दीकी नावाच्या युट्यूबरने म्हटले होते.

Updated: Nov 19, 2020, 08:11 PM IST
अक्षय कुमारचा युट्यूबरवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा  title=

नवी दिल्ली : अक्षय कुमारने  (Akshay Kumar) एका युट्यूबरवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकलाय. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी अक्षय कुमार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray)  गुपचूप बोलायचे असे राशिद सिद्दीकी नावाच्या युट्यूबरने म्हटले होते.

खोट्या बातम्या पसरवल्या 

२५ वर्षांचा हा युट्यूबर बिहारला राहणारा असून सिव्हील इंजिनियर आहे. त्याचे FF नावाने युट्यूब चॅनल आहे. रिया चक्रवर्तीला कॅनडा पळवण्यास अक्षय कुमारने मदत केल्याचा आरोप या युट्यूबरने केला होता. तसेच सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील खोटे व्हिडीओ देखील त्याने पोस्ट केले होते. युट्यूबरने सुशांतच्या मृत्यूचा वापर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी केला आणि कमाई करु लागला. 

मे मध्ये या युट्यूबरची कमाई साधारण २९६ रुपये होती. तर सप्टेंबरमध्ये त्याने ६ लाख ५० हजार ८९८ रुपये कमावले. कोर्टाने सिद्धीकीला याप्रकरणी तात्काळ जामिन देत पोलिसांना सहकार्य करण्यास सांगितले आहे.

चार महिन्यात कमावले १५ लाख रुपये 

'मिड डे'ने दिलेल्या वृत्तानुसार सिद्धीकीने दावा केलाय की, सुशांत सिंहला एमएसधोनी : द अनटोल्ड स्टोरी मिळाल्याबाबत अक्षय कुमार खुष नव्हता. सुशांत प्रकरणाशी कंटेट चालवून या युट्यूबरने चार महिन्यात १५ लाख रुपये कमावले.