बेडरुमध्ये अभिनेत्रीसोबत सापडला होता अक्षय कुमार, पत्नी Twinkle ने लगावली होती कानशिलात

Akshay Kumar: या अफेयरवरुन अक्षय कुमार आणि ट्विकल खन्ना यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. 

Updated: Oct 11, 2022, 06:05 PM IST
 बेडरुमध्ये अभिनेत्रीसोबत सापडला होता अक्षय कुमार, पत्नी Twinkle ने लगावली होती कानशिलात title=
akshay kumar caugh priyanka chopra twinkle khanna slapped nmp

Priyanka Chopra: अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) रामसेतूचा ट्रेलर रीलीज (Ram Setu trailer) झाला आहे. तरदुसरीकडे प्रियंका चोपडा आणि निके जोनस (Priyanka Chopra-Nick Jonas) एका मित्राच्या लग्नात मजा करत आहे. पण एकेकाळी बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार आणि प्रियंका चोपडा यांच्या अफेयरची चर्चा रंगली होती. या अफेयरवरुन अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna ) यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. 

काय झालं होतं नेमकं? 

मिळालेल्या माहितीनुसार, 'अंदाज'(Andaaz) हा चित्रपट 2003 मध्ये रिलीज झाला होता. यादरम्यान अक्षय आणि प्रियांकाला या चित्रपटात भूमिका मिळाली. प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडची नवी अभिनेत्री होती. मात्र अक्षय कुमारला बॉलिवूडचा सुलतान मानलं जातं.या चित्रपटादरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली. स्क्रिनवर रोमान्स करताना अक्षय आणि प्रियंका खूप जवळ आले होते. (akshay kumar caugh priyanka chopra twinkle khanna slapped nmp)

ट्विंकल खन्नाला लागली चाहुल

अक्षय आणि प्रियंका यांच्यातील वाढत्या जवळीकीची बातमी अभिनेत्री ट्विंकल खन्नापर्यंत पोहोचली. ही बातमी कळताच ट्विंकल क्षणाचाही विलंब न करता रागात सेटवर पोहोचली. त्यावेळी अक्षय आणि प्रियांका 'मुझसे शादी करोगी' (Mujhse Shaadi Karogi) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. ट्विंकल सेटवर पोहोचताच अक्षयला तिने जोरदार कानाखाली मारली असं म्हटलं जातं. एवढंच नाही तर प्रियांकाला अक्षयपासून दूर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

प्रियंकाला सुनवली खरीखोटी

ट्विंकल खन्ना सेटवर प्रियंका चोपडाला थप्पड मारायला गेली होती, पण अक्षय कुमारने तिला शांत केलं. त्यानंतर ट्विंकलने प्रियांकाला अक्षयपासून दूर राहण्याची सूचना केली. आपले वैवाहिक आयुष्य वाचवण्यासाठी अक्षय कुमारने भविष्यात प्रियंकासोबत पुन्हा कोणताही चित्रपट करणार नसल्याचेही जाहीर केलं. त्यामुळेच त्या चित्रपटानंतर अक्षय प्रियंका आजपर्यंत एकाही चित्रपटात एकत्र दिसले नाही, असं म्हटलं जातं.