OMG... सिनेमा पाहून अजय देवगनला नाही तर 'यांना' घरी नेणार काजोल

अभिनेता अजय देवगन याचा 'रेड' सिनेमा सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सस्पेंस थ्रिलर सिनेमाला क्रिटिक्सकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. मात्र, हा सिनेमा पाहिल्यानंतर अजय देवगनची पत्नी काजोलने असं काही वक्तव्य केलयं की...

Updated: Mar 16, 2018, 07:44 PM IST
OMG... सिनेमा पाहून अजय देवगनला नाही तर 'यांना' घरी नेणार काजोल title=

नवी दिल्ली : अभिनेता अजय देवगन याचा 'रेड' सिनेमा सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सस्पेंस थ्रिलर सिनेमाला क्रिटिक्सकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. मात्र, हा सिनेमा पाहिल्यानंतर अजय देवगनची पत्नी काजोलने असं काही वक्तव्य केलयं की...

'रेड' हा सिनेमा पाहिल्यानंतर सर्वचजण अभिनेता अजय देवगनचं कौतुक करत आहेत. मात्र, अजय देवगनची पत्नी अभिनेत्री काजोलला कुणी दुसरचं आवडलं आहे. इतकचं नाही तर ही भूमिका पाहून त्या व्यक्तीला घरी घेऊन जाण्याचंही काजोलने म्हटलयं.

अभिनेता अजय देवगन, अभिनेत्री इलियाना डिक्रूज आणि सौरभ शुक्ला यांनी भूमिका केलेल्या 'रेड' सिनेमाचं एक खास स्क्रीनिंग मुंबईत ठेवण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगला अभिनेत्री काजोलनेही उपस्थिती लावली.

हा सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्री काजोलला 'अम्मा' ची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री पुष्पा जोशी खूपच आवडली. इतकचं नाही तर काजोलने ट्विटरवर आपला पती आणि सिनेमाचा रिव्ह्यू ही दिला आहे.

अभिनेत्री काजोलने ट्विट करत म्हटलं की, "रेड सिनेमाचा माझा रिव्ह्यू : सिनेमा खूपच आवडला, हसली, टाळ्या वाजवल्या आणि अम्माला आपल्यासोबत घरी घेऊन जाणार."

युग अजय देवगनचा सिनेमा रिव्ह्यू : मी इनकम टॅक्स (आयकर) संदर्भात खूप काही शिकलो. 

१९८१ मध्ये लखनऊ मध्ये टाकण्यात आलेल्या एका हाय प्रोफाईल छाप्यावर आधारित 'रेड' हा सिनेमा आहे. या सिनेमात उत्तर प्रदेशात राहणाऱ्या पुष्पा जोशीने पहिल्यांदाच सिनेमात काम केलं आहे आणि त्यांचं वय ८५ आहे.

सिनेमात पुष्पा यांनी सौरभ शुक्ला यांच्या आईची भूमिका केली आहे. जवळपास सर्वच समिक्षकांनी पुष्पा जोशी यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे.