Video सुष्मिता सेन आणि तिच्या मुलीची धमालमस्ती

अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या बॉलिवूडपासून दूर गेलेली असली तरीही सोशल मीडियामध्ये मात्र ती चांगलीच अ‍ॅक्टीव्ह आहे.

Updated: Mar 16, 2018, 06:16 PM IST
Video सुष्मिता सेन आणि तिच्या मुलीची धमालमस्ती  title=

मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या बॉलिवूडपासून दूर गेलेली असली तरीही सोशल मीडियामध्ये मात्र ती चांगलीच अ‍ॅक्टीव्ह आहे.

नुकताच सुष्मिताने एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

मुलींसोबतचा खास व्हिडिओ 

अभिनेत्री सुष्मिता सेननं आज मुलींसोबतचा एक खास व्हिडिओ केला आहे. त्यामध्ये सुष्मिता तिच्या मुलींना अल्टिमेटम या शब्दाची स्पेलिंग विचारते. रेनी आणि आलिशा या सुष्मिताच्या दोन्ही मुली स्पेलिंगचं उत्तर देतात. मात्र अलिशा जे उत्तर देते ते ऐकून तुम्हीदेखील हसून हसून लोटपोट व्हाल. 

 

 

 #ULTIMEGAN 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

प्रेक्षकांच्या सकारात्मक  प्रतिक्रिया 

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या सुष्मिताच्या व्हिडिओला अनेक सकारात्मक रिप्लाय आले आहेत. 

चांगल्या भूमिकेच्या प्रतिक्षेत  

सुष्मिता सेन चांगल्या भूमिकांच्या शोधात आहे. काही दिवसांपूर्वी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, " मी असा चित्रपट करू इच्छिते जो मला सन्मान देईल' 2015 साली 'निर्बाक' या बंगाली चित्रपटामध्ये सुष्मिता शेवटची झळकली होती.