रक्ताने लाल होऊनही ऐश्वर्याने शूटींग केलं पूर्ण; यशामागच्या अफाट संघर्षाची कहानी

 बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय राय बच्चनने हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख बनवली आहे.

Updated: Apr 15, 2021, 11:50 AM IST
रक्ताने लाल होऊनही ऐश्वर्याने शूटींग केलं पूर्ण; यशामागच्या अफाट संघर्षाची कहानी title=

 नवी दिल्ली : यश मिळवायचं असेल तर मोठा संघर्ष करावा लागतो.  ध्येय साध्य करण्यासाठी घाम गाळावा लागतो.  बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय राय बच्चनने हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख बनवली आहे.  आपली वेगळी ओळख बनवण्यासाठी तिने मोठा संघर्ष केला आहे.

  हम दिल दे चुके सनम चित्रपटापासून ऐश्वर्या चर्चेत आली होती.  आज आम्ही तुम्हाला ऐश्वर्याच्या आयुष्य़ातील इंटरेस्टींग गोष्ट सांगणार आहोत.

Five facts you didn't know about Hum Dil De Chuke Sanam

 

 साल 2002 मध्ये देवदास चित्रपट प्रदर्शित झाला होता. ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांची यात प्रमुख भूमिका होती. हा चित्रपटच मुळात ऐतिहासिक बनला होता. कारण ऐश्वर्या आणि माधुरीला या दोन्ही सर्वोत्तम नृत्यांगणांना एकत्रित डान्स करताना पाहणं हे प्रेक्षकांसाठी आनंददायी होतं.
 
 डोला रे डोला रे या गाण्याला आइकॉनिक बनवण्यासाठी मोठा सेट, स्टार कास्ट, मोठे युनिट तयार कण्यात आले होते. दोन्ही अभिनेत्रींच्या पेहराव आणि ज्वेलरीवरदेखील खास लक्ष देण्यात आले होते.

When bleeding Aishwarya Rai danced on 'Dola Re Dola' till the shoot  finished | Hindi Movie News - Bollywood - Times of India

 
 माधुरीला डांसिंग डीवा म्हटले जात होते. तर तिच्या सोबत ऐश्वर्याला डान्स करायचा होता. माधुरीसोबत डान्स करण्यात अभिनेत्र्या नेहमीच उत्सुक असत. परंतु ऐश्वर्या डान्समध्ये कोणत्याच बाबतीत माधुरीपेक्षा कमी नव्हती पडली.
 

रक्ताने लाल झाली ऐश्वर्या

 खुप कमी लोकांना माहितीये की, या गाण्यादरम्यान ऐश्वर्याचा अपघात झाला होता. जड ज्वेलरीमुळे ऐश्वर्याच्या कानाला दुखापत झाली होती. त्यानंतर खुप रक्त आलं होतं. परंतु ऐश्वर्याने कोणतीही तक्रार न करत शूटींग पूर्ण केली होती.
 शूट संपल्यानंतर युनिट मेंबर्सला याची माहिती मिळाली. त्यानंतर ऐश्वर्याचे उपचार केले. अशा परिस्थितही तिने केलेल्या डान्सचं आजही कौतुक होतं.