अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्याआधीच झालंय ऐश्वर्याचं एक लग्न?

1991 मध्ये तिने आंतरराष्ट्रीय सुपरमॉडेल स्पर्धेचं पहिलं विजेतेपद पटकावलं. यानंतर ऐश्वर्या राय 1993 मध्ये आमिर खानसोबत एका जाहिरातीत दिसली होती

Updated: Nov 13, 2022, 12:07 AM IST
अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्याआधीच झालंय ऐश्वर्याचं एक लग्न?  title=

मुंबई : ऐश्वर्या रायने 1994 मध्ये मिस वर्ल्ड हा खिताब पटकावला. ऐश्वर्या राय जसजशी वयाने वाढत आहे तसंतशी ती अजून सुंदर दिसतेय. सेलिब्रिटी असल्यामुळे एकीकडे ऐश्वर्या रायला प्रसिद्धी मिळाली, तर दुसरीकडे तिला अनेकवेळा लोकांकडून चांगलं-वाईट ऐकायला मिळालं. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं असून यादरम्यान अनेक अफवा समोर आल्या होत्या.

ऐश्वर्या रायने 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं. राय आणि बच्चन कुटुंबीय हे लग्न खाजगी ठेवू इच्छित होते पण त्यादरम्यान दोघांचं लग्न खूप चर्चेत होतं. एकीकडे अभिषेक आणि ऐश्वर्या आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत असताना दुसरीकडे ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न करण्यापूर्वी अभिनेत्री आधीच एका लग्नबंधनात अडकल्याचं बोललं जात होत. आणि हे लग्न अभिनेत्रीने झाडाशी लग्न केल्याची अफवा उडू लागली होती.

या सगळ्या अफवांवर ऐश्वर्याची नंतर प्रतिक्रियाही आली, एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्या राय म्हणाली होती की, तिच्या लग्नादरम्यान अशा अनेक अफवा पसरत होत्या आणि अशा गोष्टी प्राइम टाइममध्ये दाखवल्या जात होत्या. यावेळी बातम्यांमध्ये प्रसिद्ध करणं, मासिकाच्या मुखपृष्ठावर अशी स्टोरी टाकणे, हा सगळा मूर्खपणा होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऐश्वर्याने मुलाखतीत सांगितलं होतं की, आंतरराष्ट्रीय मीडियानेही याबाबत तिला प्रश्न विचारले होते ज्याचे स्पष्टीकरण कसं करावं हे ऐश्वर्याला समजत नव्हतं. ऐश्वर्याने सांगितलं होतं की सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र होतो आणि नंतर आम्ही मीडियाशी लग्नाबद्दल बोललो आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

आम्ही तुम्हाला सांगतो की ऐश्वर्या राय अभ्यासात हुशार होती आणि तिला आर्किटेक्ट बनायचं होतं. पण नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं, ऐश्वर्या राय तिच्या अभ्यासादरम्यान मॉडेलिंगच्या जगात आली आणि 1991 मध्ये तिने आंतरराष्ट्रीय सुपरमॉडेल स्पर्धेचं पहिलं विजेतेपद पटकावलं. यानंतर ऐश्वर्या राय 1993 मध्ये आमिर खानसोबत एका जाहिरातीत दिसली होती. ऐश्वर्या रायच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची मणिरत्नम यांच्या 'पोनियान सेलवन' या चित्रपटात दिसली होती.