Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चनच्या अभिनयाचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. 1994 साली 'मिस वर्ल्ड' हा किताब तिला मिळाला होता. त्यामुळे तिची तेव्हा पासून चांगलीच चर्चा रंगलेली होती. जगभरात तिचे कौतुक केले जात होते. त्यानंतर ऐश्वर्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आज ऐश्वर्या राय बच्चन ही आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या नावावर अनेक लोकप्रिय चित्रपट आहेत. गेली 20 हून अधिक वर्षे ती या क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. अनेक ब्यूटी प्रोडक्ट्सची ती ब्रॅण्ड एम्बॅसिडर आहे, चेहरा आहे.
तिच्या सौंदर्यावरही अनेक जणं फिदा आहे. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या पहिल्या चित्रपटाची. तुम्हाला माहितीये का की पहिल्या चित्रपटातून ऐश्वर्या नक्की कशी दिसत होती? या लेखातून पाहुया की नक्की तिचा पहिला सिनेमा कोणता होता आणि आपल्या पहिल्या चित्रपटात ऐश्वर्या कशी दिसायची?
हेही वाचा : रात्री लावलेली लिपस्टिक सकाळी गायब, नवऱ्यानं घेतला पत्नीवर संशय; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
खरंतर जसजसं वय वाढत जातं तसतसं आपलं रूप हे बदलतं जातं. त्यातून आपल्या सौंदर्यातही अनेक बदल होतात. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे ऐश्वर्याच्या पहिल्या चित्रपटातील लुकची. तुम्हाला महितीये का की मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिनं एका मोठ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून काम केले होते. त्यावेळी तिचे वयही फारच लहान होते. त्यातून तिनं आपल्याेपक्षा मोठ्या वयाच्या अभिनेत्याशी लग्न केले होते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. हा चित्रपटही तेव्हा गाजला होता. तेव्हा सोशल मीडियाही नव्हता. त्यावेळी तिनं आपल्या सौंदर्यांनं सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती. आजकाल ऐश्वर्याची आणि आराध्या बच्चनची अनेकदा चर्चा रंगलेली दिसते. अनेकदा त्या एअरपोर्टवर स्पॉटही होताना दिसतात.
1994 साली मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिनं 1997 साली ऐश्वर्यानं मणिरत्नमचा सिनेमा केला होता. त्याचे नाव होते 'इरूवर'. यातला तिचा लुक हा अत्यंत निरागस होता. त्यातून तिनं तिच्यापेक्षा वयानं 14 वर्षे मोठ्या अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत रोमान्स केला होता. त्यानंतर तिचा सुपरहिट सिनेमा होता तो म्हणजे 'हम दिल दे चुके सनम'. यावेळी सलमान खान आणि तिच्या अफेअरची सुरूवात झाली होती. परंतु त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते. त्यांच्या या अफेअरची आजही बरीच चर्चा होताना दिसते. अभिषेक बच्चन हा तेव्हा कॉलेजमध्ये होता असा अंदाज आहे. ऐश्वर्याच्या डेब्यूनंतर चार वर्षांनी त्यानं बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.