अभिषेक - ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा? 'त्या' एका फोटोमुळं रंगली चर्चा

Aishwarya Rai Bachchan Birthday: ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा निर्माण झालाय का असा प्रश्न सध्या चर्चेत आहे  

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 2, 2023, 05:34 PM IST
अभिषेक - ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा? 'त्या' एका फोटोमुळं रंगली चर्चा title=
Aishwarya Rai Bachchan birthday celebration without Bachchan mother and daughter aaradhya

Aishwarya Rai Bachchan Birthday: विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan ) हिने अलीकडेच तिचा वाढदिवस साजरा केला. ऐश्वर्याने बुधवारी तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर सध्या ऐश्वर्याच्या वाढदिवसाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ऐश्वर्याने तिची मुलगी आराध्या आणि आईसोबत यंदाचा वाढदिवस साजरा केला. तसे फोटो समोर आले आहेत. मात्र, यावेळी अनेकांना एक गोष्ट खटकली ती म्हणजे अभिषेक बच्चन आणि बच्चन कुटुंबीयांची उपस्थिती. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा आला असल्याची चर्चा रंगली आहे. (Aishwarya Rai And Abhishek Bachchan)

ऐश्वर्या आणि अभिषेक या जोडीची गणना बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांमध्ये होतं. त्यांच्या लग्नाला 16 वर्ष पूर्ण झाली असून त्यांना एक गोड मुलगी देखील आहे. मात्र सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाबाबत अनेक चर्चा रंगत असतात. दोघांचं लग्न एका कठिण वळणावर येऊन ठेपलं असून ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे नाते त्यांच्या सासरच्या लोकांमुळं खराब होत आहे, असं म्हटलं जातं. त्यातच ऐश्वर्याच्या वाढदिवसाच्या फोटोंमुळं या चर्चेला उधाण आलं आहे. 

1 नोव्हेंबर 2023 रोजी  Aishwarya Rai Bachchan ने तिचा पन्नासावा वाढदिवस होता. एका रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभावेळी तिने तिचा वाढदिवस साजरा केला. त्याचबरोबर 1 लाख रुपयेही दान केले. तिने तिची आई वृंदा आणि मुलगी आराध्यासोबत हा खास दिवस साजरा केला. ऐश्वर्याच्या 50 व्या वाढदिवसाला अभिषेक व बच्चन कुटुंबीयातील एकही सदस्य उपस्थित नव्हता ही गोष्ट नेटकऱ्यांना खटकली. दोघांच्या नात्यात काही समस्या आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

दरम्यान, ऐश्वर्या बच्चनच्या वाढदिवसानिमित्त अभिषेकने केलेल्या पोस्टवरुनही नेटकऱ्यांनी त्याला सुनावलं होतं. अभिषेकने ऐश्वर्याचा एक फोटो आणि फक्त हॅपी बर्थडे इतकंच पोस्ट केलं होतं. मात्र, त्याच्या या पोस्टवरुन नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली आहे. वडिलांच्या बर्थ-डेला मोठी पोस्ट टाकतोस मग बायकोसाठी फक्त हॅपी बर्थ-डे इतकंच का लिहलं? असा प्रश्न एकाने केला आहे. तर, एकाने आज तिचा 50 वा वाढदिवस आहे तिचे चाहते या साठी खूप उत्सुक आहेत. ट्विटरवरही ट्रेंड असताना तु तिच्यासाठी काहीच केले नाहीस. बायकोवर इतका का जळतोस? असा प्रश्न एका युजरने केला आहे.