Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Aishwarya Rai Bachchan News : आताची सर्वात मोठी बातमी,  ऐश्वर्या राय बच्चन हिला थकबाकीसंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या. 

Updated: Jan 17, 2023, 08:58 AM IST
Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस, काय आहे प्रकरण जाणून घ्या title=
Aishwarya Rai Bachchan big news gets notice for not paying tax Nashik news in marathi

Aishwarya Rai Notice : योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची सून आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मोठ्या अडचणीत सापडली आहे. ऐश्वर्याला थकबाकीसंदर्भात एक नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Net Worth) यांच्या कुटुंबात तणाव आहे. बिग बी यांनी आपल्या संपत्तीच्या दोन हिस्से होतील असं स्पष्ट केलं आहे. मुलगा अभिषेक बच्चनसोबत मुलगी श्वेता बच्चन नंदा (Shweta Bachchan Nanda) हिलाही संपत्तीमधील बरोबरीचा अधिकार मिळणार आहे. त्याच आता बच्चन कुटुंबियांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. सून ऐश्वर्या राय बच्चन हिला सिन्नर (Sinner) तहसीलदार कार्यालयाने नोटीस बजावली आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?

नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील सिन्नरमधील आडवाडी गावात पवन ऊर्जा कंपनीत तिची गुंतवणूक आहे. आयकर बचत करण्यासाठी सुजलोन पवन ऊर्जा निर्मिती कंपनीत अनेक कलाकारांननी गुंतवणूक केल्या आहेत. ही कंपनी ऐश्वर्या राय बच्चन हिच्या जमीनवर आहे. ऐश्वर्याची एक हेक्टर 22 आर जमीन आहे. याच जमिनीचं एक वर्षाचं कर ऐश्वर्याने थकवलं आहे. त्यामुळे तिला नोटीस बजावण्यात आली आहे. अभिनेत्रीने 22 हजारांचा कर थकवला आहे. त्यासंदर्भात तिला ही नोटीस बजावण्यात आली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb)

'या' कंपन्यांनाही पाठवली नोटीस

मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. ऐश्वर्या राय बच्चनसोबत  बाराशे थकीत अकृषक मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आयटीसी मराठा लिमिटेड ,हॉटेल लीला वेंचर ,बलवेल रिसॉर्ट, कुकरेजा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, एअर कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड, मिटकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, छोटा भाई पटेल कंपनी, राजस्थान गम प्रायव्हेट लिमिटेड अशा अनेक इतर कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. (Aishwarya Rai Bachchan big news gets notice for not paying tax Nashik news in marathi)

दरम्यान तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय स्टार अजित कुमार (ajith kumar) ऐश्वर्या राय बच्चन सोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज आहे. तर यावर्षी 28 एप्रिल 2023 रोजी 'पोन्नियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.