VIDEO : ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी असा साजरा केला लग्नाचा 28 वा वाढदिवस

Aishwarya Narkar and Avinash Narkar Celebrate 28th Wedding Anniversary : ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी असा साजरा केला त्यांचा लग्नाचा 28 वा वाढदिवस, एकदा पाहाच...

दिक्षा पाटील | Updated: Dec 4, 2023, 06:27 PM IST
VIDEO : ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी असा साजरा केला लग्नाचा 28 वा वाढदिवस title=
(Photo Credit : Social Media)

Aishwarya Narkar and Avinash Narkar Celebrate 28th Wedding Anniversary : मराठी लोकप्रिय कपल्सपैकी एक म्हणजे अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर. हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत राहतात. त्यांचं चर्चेत राहण्याचं कारण काही वेगळंच असतं. अप्रतिम अभिनय आणि गोड स्वभाव यासाठी यांची जोडी नेहमीच ओळखली जाते. ते दोघे सोशल मीडियावर त्यांचे भन्नाट व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्यांच्या व्हिडीओचे काही वेगळेच चाहते आहेत. अशात आता त्यांनी नुकताच त्यांचा 28 वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे चर्चेचा विषय ठरले आहेत. 

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या आणि अविनाश हे दोघे ही दिसत आहेत. त्यांनी अविनाश यांनी निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर ऐश्वर्या नारकर यांनी पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून पिवळी ओढणी घेतली आहे. ऐश्वर्या आणि अविनाश हे दोघेही आनंदानं त्याच्या लग्नाचा 28 वा वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहेत. त्याशिवाय त्यांनी काही सुंदर असे फोटो देखील शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत ऐश्वर्या नारकर यांनी कॅप्शन दिलं आहे की 28 वर्षे आणि हार्ट इमोजी देखील शेअर केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : रवीना, करिश्माला खांबाला बांधून विसरला होता 'हा' दिग्दर्शक! नेमकं काय घडलं?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोघांना सुध्दा.... अजून 50 वां लग्नाचा वाढदिवस तुमचा डान्स करताना साजरा झालेला आम्ही बघत एन्जॉय करणार.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आवडत्या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.' तिसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली की 'असेच तुम्ही आणखी वर्षोनवर्षे एकत्र रहाल. यासाठी शुभेच्छा.' आणखी एक नेटकरी म्हणाला, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा क्युटी कपल. दुसरा नेटकरी म्हणाला, 'लग्नाच्या 28 व्या वाढदिवसाच्या अविनाश दादा आणि ऐश्वर्या ताई तुम्हाला शुभेच्छा.' अशाच अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश नारकरच्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर ते 3 डिसेंबर 1995 मध्ये लग्न बंधनात अडकले होते.