Arijit Singh News: लोकप्रिय गायक अरिजीत सिंगला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याला जगभरात लोक ओळखतात इतकंच नाही तर त्याची फॅन फॉलोइंग देखील तितकीच महत्त्वाची आहे. दरम्यान, आता संगीतकार-गायक अरिजीत सिंगनं सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्याचं कारण म्हणजे बॉम्बे हाय कोर्टानं सांगितलं आहे की कोणत्याही सेलिब्रिटीची परवानगीशिवाय त्यांचा आवाज वापरता येणार नाही. फोटोचा वापर करून कॉन्टेन्ट तयार करणारं AI टूल्स त्यांच्या व्यक्तिमत्व अधिकारांचे उल्लंघन करतात. तर नक्की काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया.
अरिजीतनं कोर्टात एक याचिका देखील केली होती. त्या याचिकेत त्यानं म्हटलं होतं की एआय प्लॅटफॉर्म त्याचा आवाज, त्याची बोलण्याची पद्धत आणि इतर गोष्टी कॉपी करत त्याच्या आवाजात व्हॉईस रेकॉर्डिंग करत आहेत. त्यानंतर AI टूल्सच्या मदतीनं यात एडिटींग करण्यात येते आणि हे सगळं त्या टूल्समुळे शक्य आहे. 26 जुलै रोजी या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती आर.आय. छागला यांनी त्यांच्या अंतरिम आदेशात आठ ऑनलाइन प्लॅटफॉर्मला अरिजित सिंगच्या व्यक्तिमत्त्वाचे अधिकार वापरण्यास मनाई केली होती. त्यासोबतच त्यांनी असा सर्व कंटेन्ट आणि व्हॉइस टूल्स काढून टाकण्याचे आदेश दिले.
अरिजीतचे वकील हिरेन कामोद यांनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षांपासून त्यानं कोणतंही ब्रॅन्ड एंडॉर्समेंट अर्थात कोणत्याही ब्रॅन्डची जाहिरात ही केलेली नाही. कोर्टानं या सगळ्यात असं म्हटलं आहे की अरिजीतला तात्काळ दिलासा दिला पाहिजे. न्यायमूर्ती यांनी सांगितलं की 'न्यायालयाला या गोष्टीची चिंता आहे की सेलिब्रिटीज हे अनऑथोराइज्ड AI कंटेन्टचे टारगेट होतात.'
हेही वाचा : Antilia च्या 26 व्या मजल्यावर का राहतात मुकेश आणि नीता अंबानी?
याविषयी पुढे बोलत न्यायमूर्ती म्हणाले, 'अभिव्यक्ती आणि बोलण्याच्या स्वातंत्र्यानुसार प्रत्येकाला टीका करण्याचा आणि मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. मात्र आर्थिक किंवा व्यवसायिक फायद्यासाठी सेलिब्रिटीचं व्यक्तीश: शोषण करण्याची परवानगी याअंतर्गत देता येणार नाही. त्याशिवाय AI टेकनॉलॉजीचा असा उपयोग थांबला पाहिजे. असे काही प्लॅटफॉर्म इंटरनेट युजर्सना खोटे आवाज आणि व्हिडीओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करतात.'