मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीतील शरद केळकर आणि कीर्ती गायकवाड यांची सुंदर जोडी तुम्हा सर्वांना माहीत असेलच. शरद आपल्या भरदस्त आवाजाने लोकांच्या हृदयात छाप सोडण्यात यशस्वी झाला आहे. तर कीर्ती आपल्या दमदार आणि मनमोहक अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. दोघांची ऑफ स्क्रिन केमिस्ट्री सगळ्यांनीच पाहिली आहे. पण ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहून जमाना झाला आहे. अशा परिस्थितीत या कपलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
खरंतर, शरद केळकर आणि कीर्ती गायकवाड तब्बल 13 वर्षांनंतर स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की, दोघंही लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात दोघंही एका विवाहित जोडप्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबाबत बोलताना शरदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, 'कीर्तीसोबत पुन्हा काम करणं अमेझिंग आहे.
तिच्यासोबत शूटिंग करताना मला खूप काही शिकायला मिळालं. समोरा-समोर प्रॅक्टिकल एग्जामिनेशन होतं. ती माझी सर्वात मोठी क्रिटिक आहे. जेव्हाही तिला वाटतं की, मी कामात ढिलाई करत आहे, तेव्हा ती मला सुधारते. आम्ही दोघंही खऱ्या आयुष्यात एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि तीच केमिस्ट्री आमच्या ऑनस्क्रीनवरही दिसून येईल. त्याचबरोबर कीर्तीने याबद्दल बोलताना सांगितलं की, 'आम्ही एकमेकांचा आदर करतो आणि शूटिंग सेटवर आम्ही एकदम प्रोफेशनल वागतो. अभिनेते म्हणून, आम्ही आमच्या खऱ्या आयुष्यात कधीच आमच्या कामाच्या आड येऊ देत नाही.
आक्रोशच्या सेटवर झाली होती पहिली भेट
शरद आणि कीर्ति यांची पहिली भेट 2004 मध्ये टीव्ही शो आक्रोशच्या सेटवर झाली. या शोनंतर या दोघांची भेट जवळ-जवळ चार पाच महिन्यांनी 'सिंदूर तेरे नाम का' आणि 'सात फेरे' या टीव्ही शोच्या सेटवर झाली. यानंतर या दोघांची जवळिकता वाढू लागली. बरेच दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर 2005 साली या कपले लग्नगाठ बांधली.