Allu Arjun वर पोलिसांकडून मोठी कारवाई; गाडीत सापडली...

वाहतूक पोलिसांनी पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनची कार थांबवली

Updated: Mar 28, 2022, 07:07 PM IST
Allu Arjun वर पोलिसांकडून मोठी कारवाई; गाडीत सापडली... title=

मुंबई : हैद्राबाद ट्रॅफिक पोलिसांनी शनिवारी विशेष मोहीम राबवली.  MLA स्टिकर्स, बनावट स्टिकर्स, ब्लॅक स्टिकर्स असणाऱ्या गाड्यांवर दंड आकारण्यात आला. तर,  स्टिकर्स आणि काळी फिल्म्सही काढण्यात आले.  ज्युबली हिल्स चेक पोस्टसोबतच अनेक ठिकाणी ही मोहिम राबवण्यात आली. ज्युबिली हिल्स चेकपोस्टवर तपासणी करण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार, जुबली हिल्स ट्रॅफिक पोलिसांनी आयकॉन स्टार अल्लू अर्जुनलाही दंड ठोठावला आहे.

ट्रॅफिक पोलिसांनी जुबली हिल्स रोड क्र. 36 वरील नीरस चार रस्ता येथे त्यांच्या नियमित वाहन तपासणीदरम्यान दंड आकारला. जुबली हिल्स वाहतूक पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि कल्याण राम यांच्या गाड्या थांबवल्या.त्यांच्या गाडीवर असलेल्या काळ्या फिल्म्स काढून त्याबद्दल या दोघांनाही दंड करण्यात आला.  

वाहतूक पोलिसांनी पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुन याची कार थांबवून कारवरील टिंटेड चष्म्यातील काळी फिल्म काढून टाकली.  काळी फिल्म लावल्याबद्दल पोलिसांनी त्यांना रु. ७०० चा दंड आकारला. याच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या कल्याण रामलाही वाहतूक पोलिसांनी अशाच प्रकारे दंड ठोठावला. या दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर,  अल्लू अर्जून सध्या 'पुष्पा' सिनेमाच्या यशाचा आनंद घेत आहे. तर कल्याण राम 'बिंबिसारा'मध्ये दिसणार आहे.