वामिकाचा चेहरा जगासमोर येताच Anushka Sharma मालामाल, का होतेय अशी चर्चा?

व्हिडिओ तुफान व्हायरल झाले. 

Updated: Jan 26, 2022, 03:39 PM IST
 वामिकाचा चेहरा जगासमोर येताच Anushka Sharma मालामाल, का होतेय अशी चर्चा? title=

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे विराट आणि अनुष्काची लेक वामिका...

वामिकाचा चेहरा जगासमोर येताच तिचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. नुकतीच अनुष्का आणि वामिका विराटची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली होती. यावेळी वामिका कॅमेरात कैद झाली. तिचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल झाले. 

त्यानंतर आता अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसला मोठी रक्कम मिळणार असल्याचं बोललं जात आहे. खरं तर या दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.वामिकाचा फोटो काढायला विराट आणि अनुष्काने मीडिया आणि फोटोग्राफर्सला मनाई केली होती. पण अखेर क्रिकेटचा सामना सुरु असताना वामिका दिसली आणि तिचीच चर्चा झाली. 

या प्रकरणानंतर आता अनुष्का तिच्या प्रोडक्शन हाऊसमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा भाऊ कर्णेश शर्मा यांच्या प्रोडक्शन हाऊस क्लीन स्लेट फिल्मसने Netflix आणि Amazon सोबत करार केला आहे. हा करार सुमारे 400 कोटी ($54 दशलक्ष) किमतीचा आहे.

Clean Slate Filmz येत्या 18 महिन्यांत स्ट्रीमिंग सेवांवर 8 चित्रपट आणि मालिका प्रदर्शित करेल. नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने ब्लूमबर्गला पुष्टी केली की ते क्लीन स्लेट फिल्मझसह तीन आगामी प्रॉडक्शन्स रिलीज करतील, तर ऍमेझॉनने विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.

कंपनीने चित्रपटगृहांसाठी NH10, फिल्लौरी आणि परी या चित्रपटांची निर्मिती केली आहे, ज्यात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर अॅमेझॉन प्राईम सीरीज पाताल लोक आणि नेटफ्लिक्स चित्रपट बुलबुलची निर्मिती केली.