माधुरीकडून पाकिस्तानला बंदुकीच्या गोळ्या, रवीनाकडून बॉम्ब... पाहा India-Pak मध्ये त्यांचं काय कनेक्शन

या अभिनेत्री असं काही करतील वाटलंही नव्हतं... 

Updated: Jan 26, 2022, 03:31 PM IST
माधुरीकडून पाकिस्तानला बंदुकीच्या गोळ्या, रवीनाकडून बॉम्ब... पाहा India-Pak मध्ये त्यांचं काय कनेक्शन  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : संपूर्ण देश 73 वा प्रजात्ताक दिन साजरा करत असतानाच अचानक अभिनेत्री रवीना टंडन आणि माधुरी दीक्षित यांची नावं समोर आली. फक्त नावंच नाही, तर अभिनेत्रींच्या नावे करण्यात आलेल्या एका कामाचाही खुलासा झाला. 

रवीना आणि माधुरी असं काही करतील, यावर अनेकांचा विश्वासत बसला नाही. पण, प्रत्यक्षात मात्र हे सर्व घडून गेलंय. 

अभिनेत्री माधुरी दीक्षितचं नाव भारत- पाकिस्तामधील कारगिल युद्धात समोर आलं होतं. जेव्हा एका पाकिस्तानी सैनिकानं 'माधुरी दीक्षित हमें दे दे, अल्लाह की कसम हम सब यहां से चले जाएंगे', म्हटलं तेव्हा याचं उत्तर कॅप्टन विक्रम बत्रा यांनी गोळीनं दिलं. 

'माधुरी दीक्षित तो शूटिंग में बिझी हैं, फिलहाल इससे काम चला लो... ले बेटा माधुरी दीक्षित का तोहफा', असं म्हणत त्यांनी ही गोळी चालवली, असं सांगितलं जातं. 

माधुरी दीक्षित

रवीनानं हल्लीच एका मुलाखतीत सांगितल्यानुसार कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना तिच्या नावे बॉम्ब पाठवण्यात आले होते. 

रवीना टंडन

असंही म्हटलं जातं, की पाकिस्तानच्या मुद्द्यावरून काश्मीरच्या बदल्यात लता मंगेशकर आमच्या राष्ट्राला द्या अशीही मागणी पाकिस्ताननं केली होती. 

लता मंगेशकर

त्यांच्या या कावेबाजपणावरून प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ज्येष्ठ, दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचं नावही भारत-पाक वादात गोवलं गेलं. 

दिलीप कुमार

या वादाला तेव्हा तोंड फुटलं जेव्हा पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसूरी यांनी असं म्हटलं होतं, की भारत सरकारकडून दिलीप कुमार हे 'सिक्रेट मिशन'अंतर्गत दोनदा पाकिस्तानात येऊन गेले.