ब्रेकअपच्या चर्चांनंतर जास्मिन आणि अलीकडून मोठी घोषणा...

जास्मिन आणि अली यांचं ब्रेकअप? नक्की काय दोघांना नवीन प्लॅन...  

Updated: Feb 19, 2022, 03:44 PM IST
ब्रेकअपच्या चर्चांनंतर जास्मिन आणि अलीकडून मोठी घोषणा... title=

मुंबई : बिग बॉसमध्ये जास्मिन आणि अली गोनीची केमिस्ट्री खूप पसंत केली जात होती. या शोमध्ये दोघेही मित्र म्हणून गेले होते, पण बाहेर येताच दोघे रिलेशनशिपमध्ये आले. पण गेल्या काही दिवसांपासून जास्मिन आणि अली यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण आता या चर्चा फक्त आणि फक्त अफवा असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांचं ब्रेकअप झालं नसून दोघे एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात. 

आता एका रिपोर्टनुसार, अली आणि जास्मिन लंडनला रवाना झाले आहेत. कोणत्या प्रोफेशनल कामासाठी नाही तर दोघे वाढदिवस साजरा करण्यासाठी परदेशी गेले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

25 फेब्रुवारी रोजी अलीचा वाढदिवस आहे. त्यामुळे टीव्ही इंडस्ट्रीचं हे क्यूट कपल लंडनला रवाना झालं आहे. जास्मिन आणि अली अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. 

'बिग बॉस 14' फेम आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन (Jasmin Bhasin) ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. 

जस्मिनचे फोटो आणि व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, याशिवाय अभिनेत्री स्वतःही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.