बॅकस्टेज व्हायरल व्हिडिओनंतर गौतमी पाटीलचा शेतातला व्हिडिओ समोर

गौतमीच्या एका स्टेज शोच्या वेळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. स्टेजशोच्या वेळी गौतमी कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ शूट करण्यात आला. हा व्हडिओ फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हायरल होत होता.

Updated: Apr 22, 2023, 08:24 PM IST
बॅकस्टेज व्हायरल व्हिडिओनंतर गौतमी पाटीलचा शेतातला व्हिडिओ समोर   title=

मुंबई : आपल्या डान्समुळे चर्चेत असणारी गौतमी सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते.  इंस्टाग्रामवर गौतमीचं फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. आपल्या अदाकारीने सगळ्यांना घायाळ करणारी  गौतमी पाटीलचा (Gautami Patil Dance Video) एक प्रायव्हेट व्हिडीओ (Viral Video) काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कपडे बदलतानाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर  हे प्रकरण राज्यात चांगलच तापलं होतं. मात्र गौतमीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ शेतातला आहे.

नुकताच गौतमीचा शेतामधील व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गौतमी 'राणी माझ्या मळ्यामध्ये' या गाण्यावर रिल्स शूट करताना दिसत आहे. तिच्या व्हिडिओवर चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.गौतमी एखादी पोस्ट शेअर केली ती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. असाच गौतमीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

गौतमीच्या एका स्टेज शोच्या वेळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. स्टेजशोच्या वेळी गौतमी कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ शूट करण्यात आला. हा व्हडिओ फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केला होता. हा व्हडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. लावणी सम्राज्ञी असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी देखील यावरुन गौतमीची कानउघाडणी केली होती. राष्ट्रविकास सेनेने गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली  होती. 

गौतमी नेहमीच तिच्या डान्समुळे चर्चेचा असते.  अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती नेहमी सक्रिय असते. स्वत:चे रिल्स ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गौतमी तिच्या डान्सचे छोटे छोट्या क्लिप सोशल मीडियावर देखील शेअर करत असते. अंगविक्षेप करुन नाचतानाचे गौतमी पाटीलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाले आहेत.