श्रीदेवींच्या निधनाचे दुःख गिळत जान्हवीने केली कामाला सुरूवात...

बॉलिवूडच्या चांदनी श्रीदेवींच्या निधनाला आता आठवडा उलटून गेला. 

Updated: Mar 9, 2018, 10:54 AM IST
श्रीदेवींच्या निधनाचे दुःख गिळत जान्हवीने केली कामाला सुरूवात... title=

मुंबई : बॉलिवूडच्या चांदनी श्रीदेवींच्या निधनाला आता आठवडा उलटून गेला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे बसलेल्या धक्कातून आता हळूहळू कपूर कुटुंब सावरु लागले आहेत.

जान्हवीने केली कामाला सुरूवात

जान्हवीने देखील कामाल पुन्हा सुरूवात केली आहे. गुरूवारी जान्हवीने धडक सिनेमाचे शूटिंग सुरू केले. शूटिंगदरम्यानचे तिचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले. धडक हा जान्हवीचा पहिला सिनेमा आहे. येत्या जुलैमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल. 

नियतीला ते मान्य नव्हते

दोन्ही मुलींना आपले आयुष्य मानणाऱ्या श्रीदेवी जान्हवीच्या करिअरबद्दल खूप सजग होत्या. वेळोवेळी तिला मार्गदर्शन करत होत्या. मात्र तिचे काम, तिचा पहिला सिनेमा पाहणे त्यांच्या नशिबात नव्हते.

कामातून मिळेल ताकद

मात्र अचानक आलेल्या या भयंकर दुःखातून सावरत जान्हवीने पुन्हा कामाकडे आपले लक्ष वळवले आहे. कदाचित तिचे काम तिला आई नसल्याचे दुःख पचवायला मदत करेल.