Naga Chaitanya वर कडाडली कंगना, आता अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत Samantha म्हणाली...

या पोस्टमधील एका फोटत कंगना लहान केसांत काळा ड्रेस घालून आहे,

Updated: Oct 19, 2021, 06:51 PM IST
Naga Chaitanya वर कडाडली कंगना, आता अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत Samantha म्हणाली... title=

मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना रनौत सध्या तिच्या आगामी 'धाकड' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच तिने या चित्रपटाशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यावर सामंथा रूथ प्रभूने कमेंट देखील केली आहे. कंगनाच्या या चित्रपटाबद्दल समंथा खूप उत्साहि दिसत आहे. या अ‍ॅक्शन चित्रपटात कंगना एका गुप्तहेरची भूमिका साकारत आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटातील तिचे अनेक लूक शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करताना कंगनाने लिहिले, 'ती उत्साही आणि निर्भय आहे. #AgentAgni मोठ्या पडद्याला आग लावण्यासाठी सज्ज आहे. तुमच्यासाठी ऍक्शन स्पाय थ्रिलर #धक्कड घेऊन येत आहे जो 8 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहात दाखल होईल!'

या पोस्टमधील एका फोटत कंगना लहान केसांत काळा ड्रेस घालून आहे, तर दुसऱ्या फोटोत सेम गेटअपमध्ये हातात बंदुक घेताना दिसत आहे. तसेच ती तिसऱ्या फोटोत लाल रंगाच्या कपड्यात आणि लाल विग घालून दिसत आहे. तर चौथ्या फोटोत तिने काळ्या रंगाचा ब्लेझर आणि चष्मा घातला आहे.

कंगनाच्या या पोस्ट वर प्रतिक्रिया देताना, सामंथाने  फायर इमोजी टाकली आहेत. तिला कंगनाची ही पोस्ट आवडली. यापूर्वी कंगनाने सामंथाला 'महिला सक्षमीकरणाचे प्रतीक' म्हटले होते आणि नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटावरही तिने कमेंट केली होती.

कंगनाने म्हटले होते की, कोणत्याही नात्यात पुरुष नेहमीच घटस्फोटाचे कारण असतात. कंगणाच्या कडक शब्दांमुळे सामंथा आणि कंगनामध्ये काहीही बदललेले नाही उलट आता सामंथाने कंगनाला सपोर्ट केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता देखील कंगनासोबत धक्कड चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट बाल तस्करी आणि स्त्रियांच्या शोषणाच्या मुद्द्यांवर आधारित आहे. कंगना यात एजंट अग्नीची भूमिका साकारत आहे.

भोपाळ, बुडापेस्ट आणि मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत कंगना म्हणाली, "धाकड हा सिनेमा त्या सिनेमांसारखा सिनेमा आहे, ज्याला लोकं मोठ्या परद्यावर पाहणं पसंत करतात. आम्ही त्याला अशा पद्धतीने बनवला आहे की, त्याला फक्त थेअटरच न्याय देऊ शकतं. हा चित्रपट 8 एप्रिलला रिलीज होईल.