लग्नानंतर सासूने केली अशी मागणी, ऐकून अंकिता लोखंडेला धक्का बसला!

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्नानंतर पती विकी जैनसोबत वेळ घालवत आहे

Updated: Feb 5, 2022, 02:33 PM IST
लग्नानंतर सासूने केली अशी मागणी, ऐकून अंकिता लोखंडेला धक्का बसला! title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्नानंतर पती विकी जैनसोबत वेळ घालवत आहे. ती अनेकदा तिच्या पतीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता तिने तिच्या सासरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या सासूसोबत दिसत आहे. यादरम्यान तिची सासू अंकिताकडे अशी मागणी करते की, ती मागणी ऐकून लाजते. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सासरी पोहचली अंकिता लोखंडे
विकी जैनसोबत लग्नानंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा अंकिता लोखंडे सासरच्या घरी पोहोचली. विकी जैनच्या कुटुंबीयांनी एका विशेष पूजेचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये अंकिता लोखंडे हिने उपस्थित राहणं आवश्यक होतं.

सासूने केली अशी डिमांड
व्हिडिओमध्ये दिसत आहे की अंकिता खुर्चीवर बसली आहे आणि सासू तिला साडी देते आणि नंतर तिच्या कपाळावर कुंकू लावते. यानंतर अंकिताला ओवाळत असताना सासू म्हणते, अंकिता दुधो बाधो फुलो फलो... आणि लवकरात लवकर  गुडन्यूज दे.. हे ऐकून अंकिता लोखंडेने धक्कादायक प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी शेजारी उभी असलेली अंकिताची वहिनीही हसायला लागल्यावर अंकिता म्हणाली की तू खूप हसतेस, तू गोड बातमी दे. यानंतर अंकिता सासूच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अंकिता लोखंडेने हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मम्मा आणि वहिनी बिलासपूरची सहल अविस्मरणीय बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अंकिताचा हा व्हिडिओ खूप लाईक केला जात आहे.