मुंबई : मंगळवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास भारतीय वायूदलाने पकिस्तानी दहशत स्थळांवर ही कारवाई केली आहे.बॉलीवुडमधील प्रत्येकाने 'सर्जिकल स्ट्राइक 2.0' म्हणून या ऑपरेशनचे स्वागत केले आहे. वायुदलाच्या हल्ल्यानंतर आदित्य धार दिग्दर्शित सिनेमा 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' टोरेंट डाउनलोडवर मोठ्या प्रमाणात सर्च होताना दिसत आहे. सात आठवड्यानंतरही सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.
भारतीय सेनेने केलेल्या उरी सर्जिकल स्टाईकवर हा चित्रपट आधारलेला आहे. 2016 साली जम्मू - काश्मीरमध्ये उरी हल्ल्यात दहशदवाद्यांनी भारतीय सैनिकांनवर हल्ला केला. 18 सप्टेंबर 2016 साली उरी मध्ये झालेल्या स्फोटात 19 भारतीय जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती..या घटनेच्या 11 दिवसानंतर लगेचच भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या ताब्यातील पीओके परिसरात सर्जिकल स्टाईक केला.
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने २०० ते ३०० दहशदवाद्यांचा खात्मा केला आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर वायुदलाने १००० किलोच्या स्फोटकांसहीत हल्ला केला. या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक कॅम्प उद्धवस्त झाले आहेत. भारतीय वायूदलाच्या १२ 'मिरज २०००' या लढाऊ विमानांनी पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अनेक तळं उद्ध्वस्त केली.
१४ जानेवारी रोजी पुलवामामध्ये पाक समर्थित जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.