...म्हणून सैफनं घेतला मोठा निर्णय

काही काळापूर्वी सैफनं... 

Updated: Nov 23, 2020, 05:08 PM IST
...म्हणून सैफनं घेतला मोठा निर्णय  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : बॉलिवूड Bollywood अभिनेता saif ali khan सैफ अली खान, सध्या आत्मकथा लिहिण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. पण, त्यानं आता मात्र त्यानं आपला निर्णय बदलल्याचं दिसत आहे. यामागेही कारण तसंच आहे. काही काळापूर्वी सैफनं याबाबतची घोषणा केली होती. पण, त्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवण्यात आली. 

यापूर्वीही सैफनं घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन अनेकांच्या रोषाचा सामना केला होता. आपणही घराणेशाहीला सामोरे गेल्याचं म्हणणाऱ्या सैफची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली होती. त्यामुळं आता मात्र तो पुन्हा या परिस्थितीला सामोरं जाऊ इच्छित नाही.

एका पॉडकास्ट शोमध्ये सैफनं याबाबतची माहिती दिली. आपण आत्मचरित्र लिहिण्यासाठी उत्सुक असल्याचं तो म्हणाला होता. पण, आता मात्र आपली अशी इच्छा नसल्याचं त्यानं सांगितलं. 'मी मुळात अतिशय दु:खानं ही बाब सांगत आहे. मला असं वाटतं फक्त सर्वसामान्य प्रेक्षकच नाही, तर पण या देशातच प्रेक्षकांचा एक असा वर्ग आहे जो सध्याच्या घडीला अत्यंत नकारात्मक आहे. त्यामुळं मी स्वत:ची आत्मकथा लिहून माझ्या आयुष्यातील काही गोष्टी त्यांच्याशी शेअर नाही करु इच्छित'. 

 

बॉलिवूडमधील नवाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सैफ अली खान, याच्या आत्मचरित्राबाबत प्रेक्षकांना कमालीचं कुतूहल लागून राहिलं होतं. त्यामुळं आता या आत्मचरित्रासाठी आणि सैफच्या अनुभवांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार हे नक्की.