आर्यनच्या अटकेनंतर सलमानच्या वडिलांची शाहरुख खानला मोठी मदत

मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे अभिनेता शाहरुख खान सध्या कठीण टप्प्यातून जात आहे. 

Updated: Oct 13, 2021, 03:04 PM IST
आर्यनच्या अटकेनंतर सलमानच्या वडिलांची शाहरुख खानला मोठी मदत title=

मुंबई : मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे अभिनेता शाहरुख खान सध्या कठीण टप्प्यातून जात आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे अनेक स्टार्स शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाला उघडपणे समर्थन करत आहेत.

काही स्टार्स सोशल मीडियाच्या माध्यमातून किंग खानला सपोर्ट करत आहेत. त्याचबरोबर काही स्टार्स मन्नतमध्ये शाहरुख खानच्या घरी पोहोचत आहेत. यामध्ये अभिनेता सलमान खानचा ही समावेश आहे.

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचे नाव आल्यानंतर सलमान खान रात्री उशिरा शाहरुख खानच्या घरी पोहोचला. नुकतच सलमान खान वडील सलीम खान यांच्यासोबत शाहरुख खानच्या घरी पोहोचला. अभिनेता त्याच्या घराकडे जात असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये सलमान खानची कार रेंज रोव्हर दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत व्हूमप्लाने पोस्टमध्ये लिहिले, 'आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासादरम्यान सलमान आणि सलीम खान मन्नतला शाहरुख खानच्या घरी पोहोचले.' सलमान खान आणि सलीम खान यांचा शाहरुख खानच्या घरी जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दोन्ही कलाकारांचे चाहते त्यांच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. यापूर्वी 4 ऑक्टोबर रोजी शाहरुख खानचा मित्र सलमान खान त्याला भेटण्यासाठी मन्नतला पोहोचला होता. सलमान खान आणि शाहरुख खान त्यांच्या मैत्रीमुळे ही खूप चर्चेत असतात.

जरी एक काळ होता जेव्हा माध्यमांमध्ये या दोन अभिनेत्यांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या येत होत्या, परंतु आता शाहरुख खान आणि सलमान खान खूप खास मित्रांपैकी एक आहेत. दोघेही उघडपणे त्यांच्या मैत्रीबद्दलचे प्रेम माध्यमांसमोर व्यक्त करतात.