अरबाजनंतर आणखी 3 बॉलिवूड प्रोड्यूसर पोलिसांच्या रडारवर

अरबाजनंतर आणखी 3 बॉलिवूड प्रोड्यूसर पोलिसांचा रडारवर

Updated: Jun 2, 2018, 02:58 PM IST
अरबाजनंतर आणखी 3 बॉलिवूड प्रोड्यूसर पोलिसांच्या रडारवर title=

ठाणे : आयपीएलवर सट्टा लावल्याप्रकरणी अभिनेता अरबाज खानच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अरबाज खानने आयपीएलवर सट्टा लावल्याचं कबूक केलं आहे. पण आता अरबाजनंतर ठाणे पोलिसांच्या रडारवर आणखी 3 फिल्म प्रोड्यूसर आहेत. सीनियर इंस्पेक्टर प्रदीप शर्मा हे अरबाजची चौकशी झाल्यानंतर ठाणे पोलीस कमिश्नर कार्यालयात पोहोचले आहेत. सध्या 2 अधिकारी अरबाज खानसोबत ठाणे पोलिसांच्या अँटी एक्सटॉर्सन सेल कार्यालयात आहेत. प्रदीप शर्मा यांनी 2 तास अरबाजची चौकशी केली. 

पोलिसांनी अरबाज खान आणि बुकी सोनू जालानची समोरासमोर चौकशी केली. पोलिसांनी अरबाजला विचारलं की तुम्हाला माहित नाही का हा आरोपी सट्टा लावतो. त्याचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहे." मीडिया रिपोर्ट्सनुसार अरबाजने आयपीएल-11 मध्ये 2.80 कोटींचा सट्टा लावला होता.

आयपीएल मॅचमध्ये सट्टा लावल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी सोनू जालान या बुकीला ताब्यात घेतलं. आंतरराष्ट्रीय सट्टेबाजांसोबतचा अरबाजचा एक फोटो देखील समोर आला आहे. सोनू जालानला अरबाजने पैसे परत न करण्याची धमकी दिली होती. यानंतर जालानने अरबाजचं नाव पोलिसांसमोर उघड केलं.

अरबाजशिवाय विंदू दारा सिंहचं नाव देखील समोर आलं आहे. जालानने चौकशीत म्हटलं की, '3 कोटी हारल्यानंतर अरबाजकडे पैसे मागितले पण त्याने देण्यास नकार दिला. या गोष्टीवरुन दोघांमध्ये वाद सुरु होता.'