अभिनेता अरबाज खानला अटक होणार

अरबाज खान सापडला अडचणीत

Updated: Jun 2, 2018, 02:42 PM IST
अभिनेता अरबाज खानला अटक होणार title=

ठाणे : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान सध्या अडचणीत सापडला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आयपीएलमध्ये सट्टा लावल्याची गोष्ट त्याने कबूल केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अरबाज खानने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्यानंतर आता ठाणे पोलीस त्याला ताब्यात घेणार असल्य़ाची सूत्रांची माहिती आहे. सट्टेबाज सोनू जालानला ओळखत असल्याचं देखील त्याने कबूल केलं आहे. सीनियर इंस्पेक्टर प्रदीप शर्मा चौकशीनंतर ठाणे पोलीस कमिश्नर कार्यालयात पोहोचले आहेत. पाहा सविस्तर बातमी...

अरबाज शनिवारी सकाळी बॉडीगार्ड शेरासोबत पोलीस स्थानकात आला. पोलिसांसमोर चौकशीसाठी येण्याआधी अरबाज सलमान खानला भेटण्यासाठी देखील गेला होता. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी बुकी सोनू जालानला अटक केली. त्याने या प्रकरणात अरबाज खानचं नाव घेतलं होतं.

चौकशीत अरबाजने खुलासा केला आहे की, त्याने 6 वेळा सट्टा लावला. अरबाजने हे देखील कबूल केलं की या दरम्यान त्याला करोडोंचं नुकसान झालं. पाऊने तीन कोटींचं नुकसान झाल्याचं त्याने म्हटलं आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x