मुंबई : गायक, सूत्रसंचालक आदित्य नारायण यंदाच्या वर्षअखेरीस विवाह बंधनात अडकणार आहे. 'शापित' फेम अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत आदित्य लग्न करणार आहे. आदित्य आणि श्वेता दहा वर्षांहून अधिक काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. आता सोशल मीडियावर पहिल्यांदाच गर्लफ्रेंडसोबत फोटो शेअर करत चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. आदित्य आणि श्वेता डिसेंबर महिन्यात विवाह करणार आहे. सध्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्यामुळे आदित्यने काही काळ सोशल मीडियापासून दूर राहणं पसंद केले आहे. 'शापित' चित्रपटाच्या सेटवर श्वेता आणि आदित्यची पहिली भेट झाली. त्यांची पहिली भेट आता या नात्याला एका वेगळ्या वळणावर नेणार आहे.
पहिल्यांदा गर्लफ्रेंडसोबत फोटो शेअर करत आदित्य म्हणाला, 'आम्ही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहोत. मी स्वःला अत्यंत भाग्यशाली समजतो की श्वेतासारखी पार्टनर मला भेटली. डिसेंबर महिन्यात आम्ही लग्न करणार आहोत. अता सध्या लग्नाच्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे सोशल मीडियापासून दूर राहणार आहे. डिसेंबर महिन्यात भेटूच...'
श्वेताने आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तंदुरी लव', 'शापित' या चित्रपटांच्या माध्यमातून तिला प्रसिद्धी मिळाली. तिचा 'तंदुरी लव' २०१५ मध्ये रुपेरी पडद्यावर दाखल झाला होता.
आदित्य आणि श्वेता वर्षांपेक्षा अधीक काळापासून ते एकमेकांना ओळखतात. त्यांच्या नात्याची सुरूवात मैत्रीपासून झाली. कालांतराने त्यांच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अता अखेर डिसेंबर महिन्यात विवाह बंधनात अडकणार आहेत.