Adipurush पाहण्यासाठी अवतरले साक्षात मारुतीराया? चित्रपटगृहातील माकडांना पाहून चाहत्यांनी जोडले हात

Adipurush Review : काही चित्रपट हे प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय ठरतात आणि याच चर्चा चित्रपटांना लोकप्रियतेच्या झोतात आणतात. अशाच यादीतीत एक चित्रपट म्हणजे 'आदिपुरुष'.   

सायली पाटील | Updated: Jun 16, 2023, 12:18 PM IST
Adipurush पाहण्यासाठी अवतरले साक्षात मारुतीराया? चित्रपटगृहातील माकडांना पाहून चाहत्यांनी जोडले हात  title=
Adipurush screening was suspershit as a monkey came and grab attention watch video

Adipurush Review : अभिनेता प्रभास (Prabhas) याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या घोषणेपासूनच अनेक चर्चा रंगल्या. काही चर्चांनी चित्रपटाबाबतच नकारात्मक गोष्टी पसरवल्या तर, काही चर्चांनी कलाकारांची मेहनत प्रकाशझोतात आली. अशा या चर्चांच्याच वर्तुळात असणारा हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. 

16 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांवर अवघ्या काही क्षणांतच भुरळ पाडल्याचं सकाळच्या शोमध्येही पाहायला मिळालं. जिथं एकिकडे चित्रपटाच्या प्री बुकिंग आणि सॅटेलाईट हक्कांच्या कमाईमुळं गल्ला चांगलाच जड झाला तिथेच आता प्रत्यक्षातही प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येऊन या चित्रपटाला दाद देत आहेत. रामायणाचा आणखी एक नवखा आणि लक्षवेधी दृष्टीकोन Adipurush च्या निमित्तानं सर्वांनाच पाहायला मिळत आहे. 

चित्रपट पाहायला आले रामभक्त हनुमान 

सध्या सोशल मीडियावर Adipurush च्या स्क्रीनिंगदरम्यानची अनेक दृश्य व्हायरल होत आहेत. या दृश्यांमध्ये चित्रपट गृहांमध्ये येणारे प्रेक्षक, शाळकरी मुलं यांची गर्दी तर दिसतेय पण, तिथं आणखी एका उपस्थितीनंही नजरा वळत आहेत. ही उपस्थिती आहे रामभक्त हनुमंताची. 

सोशल मीडियावरील एका व्हिडीओमध्ये आर्य विद्यामंदिरचे विद्यार्थी चित्रपट पाहण्यासाठी आल्याचं दिसतंय तर, याच स्क्रिनिंगच्या सुरुवातीला तिथं चक्क मारुतीरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात असल्याचं पाहायला मिळालं. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सर्व theaters मध्ये एक जागा ही हनुमानासाठी राखीव असेल असं सांगण्यात आलं होतं याचीच प्रचिती यावेळी आली. 

हेसुद्धा वाचा : क्रिती सेननआधी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही साकारलेली सीता; पाहा Photos

आणखी एक सर्वात आश्चर्यचकित करणारं दृश्यही इथं पाहायला मिळालं. कारण, या व्हिडीओमध्ये एकिकडे Adipurush चित्रपट सुरु होता आणि दुसरीकडे चक्क एक माकड ही स्क्रिनिंग पाहत असल्याचं लक्षात आलं. माकडाकडे लक्ष जाताच उपस्थित चाहत्यांनी, हे तर खुद्द रामभक्त हनुमान... असं म्हणत या लीलेपुढे हात जोडले. भाबडा विश्वास आणि देवदेवतांप्रती असणारं प्रेम यावेळी व्यक्त झालं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, तो अनेकजण शेअर, रिशेअर आणि रिपोस्ट करताना दिसत आहेत. 

एकिकडे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चाहत्यांनी त्याबद्दल दमदार प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलेली असतानाच आता या चित्रपटाच्या कमाईचे आकडे नेमके कोणत्या वेगानं वाढतात आणि कोणते नवे विक्रम प्रस्थापित करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.