मुंबई : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता प्रभास सध्या 'आदिपुरुष' (Adipurush) या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये प्रभास भगवान श्री राम यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात प्रभासला रामच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक असताना, अभिनेता शरद केळकर प्रभासच्या 'आवाज'च्या भूमिकेत परतल्यानं त्यांना आनंद झाला आहे. शरद केळकरच्या आवाजाने प्रभासला संपूर्ण भारताचा स्टार बनवलं. पण नंतर प्रभासनं त्याच्या सर्व हिंदी चित्रपटांमध्ये ना शरद केळकर किंवा इतर कोणत्याही अभिनेत्याकडून डबिंग केलं नाही. परिणामी प्रभासचे चित्रपट फ्लॉप झाले. प्रभासला इच्छा असूनही बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवता आलं नाही. अशा परिस्थितीत आता चित्रपट निर्मात्यांना पुन्हा एकदा प्रभाससाठी शरद केळकरची आठवण झाली आहे. प्रभासला बॉलिवूडमध्ये चमकायचे असेल तर शरद केळकरचाच (Sharad Kelkar) आधार आहे, हे निर्मात्यांना समजलं आहे. तर शरद केळकर प्रभासच्या बॉलीवूडमधील यशाची शिडी ठरला आहे का? असा सवाल अनेकांनी उभा केला आहे.
एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 'बाहुबली: द कन्क्लूजन' या चित्रपटांमध्ये प्रभासला शरद केळकरनं आवाज दिला होता. संपूर्ण भारतात प्रदर्शित झालेले हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. 'बाहुबली 1' आणि 'बाहुबली 2' ने बॉक्स ऑफिसवर केवळ विक्रमच केले नाहीत तर प्रभासला संपूर्ण भारताचा स्टार बनवलं. म्हणजे एकप्रकारे 'बाहुबली' प्रभासला बॉलिवूडचा 'स्टार' बनवण्यात शरद केळकरचीही महत्त्वाची भूमिका होती. (Adipurush Makers Rope In Sharad Kelkar As Prabhas Voice In The Film Man Behind Actor s Success In Bollywood )
शरद केळकरचा आवाज प्रभासवर अगदी साजेसा आहे. 'बाहुबली'च्या यशामागील कारण प्रभासचे स्टारडम आणि बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचण्याची त्याची क्षमता असल्याचे मानलं जात होतं. वृत्तानुसार, प्रभासला संपूर्ण भारतातील हिट स्टार बनवण्यात शरद केळकरचाही सहभाग असल्याचं निर्मात्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. कदाचित याच कारणामुळे 'बाहुबली' नंतर साऊथ चित्रपट निर्मात्यांनी प्रभाससोबत बनवलेले दोन पॅन इंडिया चित्रपट, 'साहो' आणि 'राधे श्याम' हे दोन्ही चित्रपट फारच फ्लॉप झाले. या दोन्ही चित्रपटांसाठी निर्मात्यांनी प्रभाससाठी डब करण्याऐवजी त्याचा मूळ आवाज वापरण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय निर्मात्यांनाच जड गेला.
There are no words to describe my feeling to all the amazing dubbing sessions for Baahubali. Being associated with such an iconic film and being the voice of #Prabhas was truly satisfying. And even after 5 years, the excitement & the joy remains the same.#5YearsOfBaahubaliRoar pic.twitter.com/PNSZ7XYmYl
— Sharad Kelkar (@SharadK7) July 10, 2020
जेव्हा 'साहो' आणि 'राधे श्याम' प्रदर्शित झाले तेव्हा प्रेक्षकांनी प्रभासच्या खराब हिंदी आणि स्लो डायलॉग डिलिव्हरीवर टीका केली होती. प्रभासनं हिंदी चित्रपटांसाठी डबिंग करावं, असे सर्वांचे म्हणणे होते. दोनदा अडखळल्यानंतर आता सर्वांनाच हे समजलं. त्यामुळेच 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांना कोणताही धोका पत्करायचा नव्हता. यासाठी त्यांनी लगेचच शरद केळकर यांना 'आदिपुरुष'मध्ये घेतलं. या चित्रपटात प्रभू राम बनलेल्या प्रभासला शरद केळकरनं आवाज दिला आहे. 'आदिपुरुष'च्या टीझरमध्ये प्रभासला दिलेला शरदचा आवाज खूपच शोभणारा आहे. चाहते त्याचे कौतुक करताना थकत नाहीत.