Video: Hrithik Roshan मनगटाला बांधलेला काळा धागा कापत म्हणाला, "Vikram Vedha बॉक्स ऑफिसवर..."

हृतिक रोशन स्टारर 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) चित्रपट अपेक्षेप्रमाणे बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.

Updated: Oct 3, 2022, 05:29 PM IST
Video: Hrithik Roshan मनगटाला बांधलेला काळा धागा कापत म्हणाला, "Vikram Vedha बॉक्स ऑफिसवर..."  title=

Hritik Roshan Cut Black Thread On His Wrist: हृतिक रोशन स्टारर 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) चित्रपट अपेक्षेप्रमाणे बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. एका आठवड्यात या चित्रपटाने 38-39 कोटींची कमाई केली आहे. आताही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटाच्या कामगिरीनंतर ऋतिक रोशननं (Hritik Roshan) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हृतिक रोशन मनगटाला बांधलेला काळा धागा कापताना दिसत आहे. त्याचबरोबर या व्हिडीओसह एक पोस्ट देखील लिहिली आहे. वर्षानुवर्षे अनुष्ठान केलं आता सोडून देण्याची वेळ आली आहे, असं हृतिकने पोस्टमध्ये सांगितलं आहे. 

"मला माहिती नाही मी धागा बांधणं कधी सुरु केलं आणि का? मी प्रत्येक पात्र साकारताना भीतीपोटी केल्याची जाणीव होते. बहुतेकदा कबीरने लाल धागा घातला होता किंवा काळा धागा असेल. मी कधी सुरुवात केली ते मला आठवतही नाही. कहो ना प्यार है? कोई मिल गया? मला हे चित्रपट पाहून मनगट किंवा गळा तपासावा लागेल.", असं हृतिक रोशननं पोस्टमध्ये  म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

"धागा कापताना थोडी संभ्रमावस्था होती. मी विक्रम वेधानंतर तसं करण्याचा प्रयत्न केला. पण तसं करू शकलो नाही. जेव्हा मी हे केलं तेव्हा मी मलाच प्रश्न विचारला. तेव्हा त्याचं समाधानकारक उत्तर होतं. मी सर्वकाही दिलं होतं? मी अजून असं काही करू शकतो का? या प्रश्नामुळे मला कायम भीती वाटते, प्रेरित करते आणि मला शोधत राहते." असं हृतिक रोशननं पुढे सांगितलं आहे.