Adhipurush Box Office Collection: प्रभासचा 'आदिपुरुष' (Adhipurush) चित्रपट सध्या संपूर्ण देसभरात चर्चेचा विषय आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी वादात अडकलेल्या 'आदिपुरुष'च्या पहिल्या तीन दिवसांच्या कमाईने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. 'आदिपुरुष'चे व्हीएफएस, डायलॉग यावरुन वाद सुरु असून त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. पण यानंतरही 'आदिपुरुष'ला शुक्रवारी मिळालेली ओपनिंग पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत होते.
'आदिपुरुष'ची ओपनिंग 65 ते 70 कोटींपर्यंत होईल असा अंदाज सर्व तज्ज्ञ लावत होते. मात्र प्रभासच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास 87 कोटींची कमाई करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. शनिवारीही चित्रपटाने कमाईचा वेग कायम ठेवला होता. रविवारी चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे फार मोठी उडी घेतली नाही. पहिल्या विकेंडला चित्रपटाने जगभरात 300 कोटींहून अधिक आणि भारतात 220 कोटींहून अधिक कमाई केली.
रविवारी झालेल्या कमाईवरुनच प्रेक्षकांचा मूड बदलत असल्याचा अंदाज आला होता. सोमवारच्या कमाईने त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 'आदिपुरुष'ची सोमवारची कमाई इतकी कमी झाली आहे की, तुमचाही विश्वास बसणार नाही.
बॉक्स ऑफिसच्या सोमवारच्या कमाईचे रिपोर्ट्स समोर आले असून, प्रभासचा चित्रपट आता वाईट पद्धतीने बुडणार असं दिसत आहे. चौथ्या दिवशी 'आदिपुरुष' भारतात 25 कोटींची कमाईही करु शकलेला नाही. रविवारी 'आदिपुरुष'ची भारतातील एकूण कमाई 69 कोटींची होती. त्यामुळे रविवारच्या तुलनेत सोमवारची कमाई एक तृतीयांशपेक्षाही कमी आहे.
'आदिपुरुष'ने पहिल्या विकेंडला बॉक्स ऑफिसवर 110 कोटींहून अधिक कमाई केली होती. पहिल्या तीन दिवशी चित्रपटाने 37 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. पण सोमवारपासून प्रेक्षक थंड प्रतिसाद देऊ लागले आहेत. रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष'च्या हिंदी व्हर्जनने सोमवारी फक्त 9 कोटी कमावले.
आदिपुरुष चित्रपट 500 कोटींमध्ये तयार करण्यात आला आहे. पहिल्या तीन दिवसांत आदिपुरुष चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. अॅडव्हान्स बुकिंगच्या आधारे अंदाज लावला जात होता की, 'पहिल्या दिवशी आदिपुरुषच्या हिंदी व्हर्जनला 30 ते 32 कोटींपर्यंत ओपनिंग मिळेल. पण ट्रेड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने दुपारच्या आणि संध्याकाळाच्या शोला चांगली गर्दी जमवली होती. त्यामुळे ही कमाई सहज 37 कोटींपर्यंत पोहोचली.
आदिपुरुषने पहिल्याच दिवशी जगभरात 140 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी 100 कोटींची कमाई झाली आहे. अवघ्या दोन दिवसां या चित्रपटने जगभरात 240 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर तिसऱ्या दिवशी कमाईचा 300 कोटींचा टप्पा पार केला आहे.
दरम्यान चित्रपटातील डायलॉग्सवर आक्षेप घेतल्यानंतर निर्माते-दिग्दर्शकांनी ते बदलण्याचा निर्णय घेतला. संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी ट्विट करत डायलॉग बदलणार असल्याचे स्पष्ट केले आहे.