बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी बुरखा घालायची अभिनेत्री, व्हायरल व्हिडीओतून सत्य उघड

प्रसिद्ध अभिनेत्री असूनही बॉयफ्रेंडला भेटताना बुरखा घालयची वेळ  

Updated: Dec 16, 2021, 09:51 AM IST
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी बुरखा घालायची अभिनेत्री, व्हायरल व्हिडीओतून सत्य  उघड title=

मुंबई : झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे फार कमी वेळा चर्चेत असतात. पण जास्त तर ते त्याच्या अफेअर्समुळे चर्चेत असतात. आपला आवडता अभिनेता, अभिनेत्री कोणाला डेट करत आहे. हे जाणून घ्यायची चाहत्यांच्या मनात उत्सुकता असते. महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियामुळे सर्व गोष्टी आता सहज सोप्या झाल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री अमृता रावचा (Amrita Rao) एक व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आला आहे. 

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आरजे अनमोलला त्याच्या चाहत्यांनी घेरलं आहे. व्हिडीओमध्ये सर्वांना ऑटोग्राफ देत असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे अमृता बुरख्यात दिसत आहे. एवढंच नाही तर ती दुरूनच गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, बुरख्यातील महिला दुसरी कोणी नसून अभिनेत्री अमृता राव आहे. हा व्हिडिओ 2011 सालचा आहे. जेव्हा अमृता आणि अनमोल एकमेकांना डेट करत होते. त्यांचं नात्याबद्दल कोणाला काही माहिती नव्हतं...

आता अमृता आरजे अनमोलसोबत वैवाहिक जीवन आनंदाने व्यतीत करत आहे. त्यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव वीर आहे. अमृता अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जिने स्वतःला नेहमीच वादांपासून दूर ठेवले होते.