खूपच अलिशान आहे अभिनेत्री वर्षा दांदळे यांचं फार्महाऊस; पाहा व्हिडीओ

अभिनेत्री वर्षा दंदाळे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ त्या सतत त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकताच वर्षा यांनी त्याच्यां नव्या फार्महाऊसचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Updated: Aug 27, 2023, 01:20 PM IST
खूपच अलिशान आहे अभिनेत्री वर्षा दांदळे यांचं फार्महाऊस; पाहा व्हिडीओ title=

मुंबई  :  काही दिवसांपुर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्वत:चं कर्जतमध्ये खूपच अलिशान फार्महाऊस बांधलंय. ज्याचे फोटो सोशल  मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. आता पुन्हा एकदा एका मराठी अभिनेत्रीच्या फार्महाऊसचे इनसाईड फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री वर्षा दांदळे आहे. नवा गडी नवा राज्य फेम अभिनेत्री वर्षा दंदाळे यांनी नाशिक जवळील एका गावात एक छोटसं फार्म हाऊस बांधल आहे. ज्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अभिनेत्री वर्षा दंदाळे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ त्या सतत त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकताच वर्षा यांनी त्याच्यां नव्या घराचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्वत: अभिनेत्रीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, एक बंगला बने न्यारा.. याच बरोबर त्यांनी कॅप्शनमध्ये हार्ट ईमोजीदेखील शेअर केले आहेत.

तर अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत म्हटलंय की, आमच्या नाशिकचं मोह कोणालाचं आवरतं नाही. सर्व जण येवु शकता पण आमच्या निसर्गाची वाट लावु नका. तर अजून एकाने म्हटलंय, तुमचे समाधान पाहून खूपच आनंद झाला. तर अजून एकाने लिहीलंय, वेलकम टू नासिक खूप छान घर आहे तुमचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन महादेव तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करून हीच इच्छा तुम्हाला शुभेच्छा. तर अजून एकाने लिहीलंय, मॅडम, आनंद आहे तुमची प्रगती पाहून. अशीच प्रगती करत रहा आणि खुश रहा. अशा अनेक कमेंट चाहते अभिनेत्रीच्या पोस्टवर करत तिचं कौतुक करत आहेत.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना आपलं हे फार्महाऊस दाखवताना त्यांना खूप आनंद झाला होता. कारण खूप दिवसांचं त्यांचं हे स्वप्न आज अखेर सत्यात उतरलं होतं. वर्षा दांदळे यांचं हे फार्महाऊस निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे. सभोवताली हिरवीगार शेती आणि त्यात त्यांचं फार्महाऊस मोठ्या दिमाखात उभं होतं. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी या गावात त्यांनी आपलं हे फार्महाऊसचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. काही महिन्यांपूर्वीच या गावात त्यांनी १० गुंठे जागा खरेदी केलेली होती. घर बांधल्यानंतर त्यांनी या जागेत काही आंब्याची झाडं लावली आहेत. एका व्हिडिओच्या माध्यमातून वर्षा दांदळे यांनी चाहत्यांना या फार्महाऊसची सफर घडवून आणली. सोबतच जेव्हा कधी या झाडांना आंबे लागतील तेव्हा तुम्हाला ती खायला नक्की बोलावेल असे आश्वासन त्यांनी त्यांच्या सहकलाकारांना आणि चाहत्यांना दिलं आहे.  

'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली 'वच्छी आत्या' अर्थात अभिनेत्री वर्षा दांदळे (Varsha Dandale Latest News) या सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतात. नांदा सौख्या भरे या मालिकेत वर्षा दांदळे यांनी वच्छी आत्याची भूमिका साकारली होती.