अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके अडकले लग्नबंधनात

तितीक्षा तावडे आणिअभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी काही दिवसांपूर्वीच केळवणाचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली सोशल मीडियावर दिली होती.

Updated: Feb 26, 2024, 08:02 PM IST
अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके अडकले लग्नबंधनात title=

मुंबई : सध्या मनरंजन सृष्टीत लग्नसराई सुरु आहे. एकीकडे अभिनेत्री पूजा सावंतच्या लग्नाच्या आधीचे विधी पार पडत आहेत. तर दुसरीकडे नुकतीच रकुल प्रीत लग्नबंधनात अडकली आहे.  तर मराठी अभिनेता प्रथमेश परबही नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. तर अनेक कलाकार त्यांच्या प्रेमाची कबुली देत आहे. मात्र आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री तितीक्षा तावडे आणिअभिनेता सिद्धार्थ बोडके  यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. या दोघांचा शाही विवाहसोहळा जवळचे नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडला आहे. नुकतेच तितिक्षाने तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

तितीक्षा तावडे आणिअभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी काही दिवसांपूर्वीच केळवणाचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली सोशल मीडियावर दिली होती. यानंतर तितिक्षाने तिच्या युट्यूबवर प्रपोजचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. नुकतीच तितिक्षा आणि सिद्धार्थने गुपचूप साखरपुडा उरकला होता. मात्र आता या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या दोघांच्या लग्नानंतर त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे. 

अनेकांनी त्याच्या फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं आहे की, तु अशी जवळी रहा.   तर अजून एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, किती सुंदर   
अभिनंदन मित्रांनो,तुम्ही दोघंही खूप गोड दिसत आहात.  तर अजून एकाने लिहीलंय, किती गोड. तर अजून एकाने लिहीलंय, तु अशी जवळी रहा, अखेर जवळ आले. तर अजून एकाने लिहीलं, मनःपूर्वक अभिनंदन. तर अजून एकाने लिहीलंय, खूप छान व्हिडीओ आहे.  तर अनेकांनी त्यांच्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर अनेक कलाकारांनीही या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी तितिक्षाने पाढऱ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. ज्याला सोनेरी रंगाची नक्षी आणि काठ होता. तर, सिद्धार्थने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.  लग्नाचा व्हिडीओ पोस्ट करत, 'Call us Mr. And Mrs.' असं कॅप्शन दिलं आहे. सध्या मराठी कलाविश्वातून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.