अभिनेत्री सुमाना चक्रवर्तीनं सोशल मीडियावर म्हटलं, I QUIT आणि...

सुमोनानं आपल्या इन्स्टाग्रामवर फॅन्ससोबत पोस्ट शेअर करताना 'I QUIT... DID YOU' असं फोटोसहीत म्हटलंय

Updated: Jul 25, 2019, 02:07 PM IST
अभिनेत्री सुमाना चक्रवर्तीनं सोशल मीडियावर म्हटलं, I QUIT आणि...  title=

मंबई : टीव्हीच्या पडद्यावर दिसणारे चेहरे सुंदर दिसत असले तरी सततच्या तणावामुळे अनेक सेलिब्रिटी व्यसनाच्या विळख्यात अडकलेले दिसतात. अशाच चेहऱ्यांपैंकी एक ओळखीचा चेहरा म्हणजे टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती... सुमोनाला सिगारेट ओढण्याचं व्यसनच लागलं होतं... परंतु, आता मात्र आपल्या या व्यसनावर नियंत्रण मिळवल्याचा खुलासा सुमोनानं केलाय. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सुमोनानं आपण धुम्रपानाचं व्यसन सोडल्याचं म्हटलंय. 

सुमोनानं आपल्या इन्स्टाग्रामवर फॅन्ससोबत पोस्ट शेअर करताना 'I QUIT... DID YOU' असं फोटोसहीत म्हटलंय. सुमोनानं लिहिलेल्या लांबलचक पोस्टवर 'दोन वर्षांपूर्वी आपल्या एका मित्राच्या वाढदिवशी आपण सिगारेट पिणं बंद करण्याचं ठरवल्याचं' म्हटलं. त्यानंतर आजपर्यंत कधीही सिगारेटला हात न लावल्याचंही तिनं अभिमानानं म्हटलंय. 

''हे खूप कठिण होतं... खूपच जास्त कठिण... परंतु, आता मात्र माझं शरीर व्यसनाला थारा देऊ शकत नाही. आता मात्र मी अशा ठिकाणीही उभी राहू शकत नाही जिथे इतर लोक धुम्रपान करत असतील', असं सुमोनानं स्पष्ट केलंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

2 Years Ago! the week following a dear friend’s bday... I QUIT. Simply went cold turkey. No nicotine patch, no vape. Nothing. Haven’t touched since then. Was it difficult, hell yeah. But now my body rejects smoke. Cant stand in a room where ppl are smoking anymore. . “It is so hard to leave- Until you leave. And then it is the easiest goddamned thing in the world” - John Green . . Why am i sharing this? Because being an actor is a part of my life. People follow us. Like us. Love us. Criticise us. Admire us. Hopefully with this i can inspire a few. The most important reminder being we are all flawed human beings which is quite non existent on social media. So here’s a small dose of reality. #soonerthebetter #itsnevertoolate #allthatglittersisnotgold

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti) on

कॉमेडियन कपिल शर्मा याच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत सुमोना प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. सुमोना सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. ती सतत मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करताना आणि नव-नव्या लूक्ससहीत फोटो शेअर करताना दिसते.