"हंपी"साठी सोनालीचा स्पेशल हेअर कट!!

शॉर्ट केस आणि चष्मा असा लुक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.   

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 30, 2017, 02:39 PM IST
 "हंपी"साठी सोनालीचा स्पेशल हेअर कट!! title=

मुंबई : आपल्या सिनेमातील भूमिका हटके असावी यासाठी अभिनेता, अभिनेत्री आपल्या लूकवर विशेष भर देतात. मग वजन कमी करणे, वाढविणे, सिक्स पॅक करणे असे वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतात. हिंदी प्रमाणे मराठीतही हा ट्रेंड असून आता आपल्या हटके हेअर स्टाइलसाठी सोनाली कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. शॉर्ट केस आणि चष्मा असा लुक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 

स्वरूप समर्थ एण्टरटेनमेन्टच्या योगेश निवृत्ती भालेराव आणि डिजिटल डिटॉक्स यांच्या निर्मितीतील हंपी हा सिनेमा समोर येत आहे. या चित्रपटाचं लेखन आदिती मोघेनं, दिग्दर्शन प्रकाश कुंटेनं आणि सिनेमॅटोग्राफी अमलेंदू चौधरी यांनी केली आहे. 
 'आजपर्यंत मी कधीच माझे केस इतके शॉर्ट केले नव्हते. त्यामुळे इतके शॉर्ट करावे असं वाटतही नव्हतं. माझ्या या भूमिकेसाठी केस शॉर्ट असावेत, ही प्रकाशचीच आयडिया होती. या भूमिकेत मी आधीपेक्षा वेगळं दिसावं अशी त्याची अपेक्षा होती असे या सिनेमाविषयी सोनाली कुलकर्णीने सांगितले. सोनाली कुलकर्णी म्हणजेच हंपीतील  'ईशा' ही टॉम बॉय आहे. तिच्या आनंद शोधण्याची गोष्ट या चित्रपटात आहे. ती शोधत असलेला आनंद तिला हंपीमध्ये सापडतो का, हे चित्रपटात पहायला मिळेल.