Sonakshi Sinha ने Kapil Sharma ला कानफडवलं

आतापर्यंत इंडस्ट्रीतील सर्व सेलेब्स कपिलच्या शोमध्ये सहभागी झाले आहेत.

Updated: Oct 2, 2021, 08:18 AM IST
Sonakshi Sinha ने Kapil Sharma ला कानफडवलं  title=

मुंबई : आतापर्यंत इंडस्ट्रीतील सर्व सेलेब्स कपिलच्या शोमध्ये सहभागी झाले आहेत. आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यात पाहुणे म्हणून येणार आहेत. पण एपिसोड प्रसारित होण्याआधी, एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.

कपिल शर्माला कॉमेडीचा बादशाह म्हटले जाते. तो आपल्या जोक्सने लोकांना हसवतो. टेलिव्हिजनवर प्रसारित होणारा त्याचा 'द कपिल शर्मा शो' हा शो खूप पाहिला जातो. हा शो टीआरपीच्या बाबतीतही अनेक शो मागे टाकतो.

कपिल शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत राहतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता कपिलने त्याच्या शोचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सोनाक्षी तिच्या 'मिल महिया' या आगामी गाण्यावर नाचताना दिसू शकते. यात कपिल येतो आणि म्हणतो - जेव्हा तू भेटायला येतेस, तेव्हा तुझे वडील म्हणतात-खामोश ! सोनाक्षी कपिलकडे टक लावून पाहते आणि नंतर कपिलच्या चेहऱ्यावर मुक्का मारते.