'अभिनेत्यांच्या पार्श्वभागावर फोटोग्राफर्स झूम करतील का?' अभिनेत्रीचा सवाल; संतापून म्हणाली, 'प्रत्येक..'

Actress On Photographers Clicking Actresses Inappropriately: यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी फोटोग्राफर्सला मागील बाजूने आपले फोटो क्लिक करु नका असं सांगितल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेकदा हे प्रकार घडलेले असतानाच आता या अभिनेत्रीने अशा प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 9, 2024, 10:57 AM IST
'अभिनेत्यांच्या पार्श्वभागावर फोटोग्राफर्स झूम करतील का?' अभिनेत्रीचा सवाल; संतापून म्हणाली, 'प्रत्येक..' title=
अभिनेत्रीने मुलाखतीत व्यक्त केली खंत

Actress On Photographers Clicking Actresses Inappropriately: 'थ्री इडियट्स' तसेच 'जस्सी जैसी कोई नही' फेम अभिनेत्री मोना सिंगने आता फोटोग्राफर्सकडून काढल्या जाणाऱ्या सेलिब्रिटी फोटोंवर आक्षेप घेतला आहे. अनेक पापाराझी म्हणजेच फोटोग्राफर्स हे अभिनेत्रींचे चुकीच्या अँगलने फोटो काढत असल्याबद्दल मोनाने उघडपणे आक्षेप व्यक्त केला आहे. महिला असल्याने असे फोटो क्लिक केले जातात असा दावा मोनाने केला आहे. अशा गोष्टी फार त्रासदायक असतात आणि त्याविरुद्ध महिलांनी आवाज उठवायला हवा असं मत मोनाने व्यक्त केलं आहे.

आवाज उठवला पाहिजे

वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाणाऱ्या अभिनेत्रींबरोबर मी स्वत:चेही वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ पाहत असते असं मोनाने 'न्यूज 18'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. मात्र अनेक पापाराझी फोटोग्राफर्स हे काहीतरी गोंधळ होण्याचा किंवा ड्रेसमध्ये काहीतरी दोष निघण्याचा वाट पाहत असतात असं वाटतं आणि त्यामधून काहीतरी खळबळजनक आपल्या कॅमेरात टीपण्याचा ते प्रयत्न करतात, असं मोना म्हणाली आहे. "मला वाटतं की प्रत्येक महिला कलाकाराने याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. हे असं वागणं बरं नव्हतं. काहीतरी होण्याची वाट पाहत ते उभे असतात, असं वाटतं," असा टोला मोनाने लगावला.

पुरुषांवर असं झूम का नाही करत?

मोना पापाराझींसमोर फारशी येत नाही. केवळ चित्रपटासंदर्भातील काही मोजके कार्यक्रम, चित्रपटांचं स्क्रीनिंग किंवा प्रमोशन्ससारख्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ती दिसते. मोना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मुंज्या' चित्रपटात झळकली आहे. अभिनेत्रींबद्दल जे घडतं तसं अभिनेत्यांबद्दल काय घडतं नाही असा प्रश्नही मोनाने उपस्थित केला. "ते कायम चुकीच्या पद्धतीने महिलांच्या शरीरावर फोकस करत असतात. ते असं पुरुषांबरोबर करतील का? एखादा अभिनेता चालत असताना त्याच्या कंबरेखालच्या भागावर (Crotch म्हणजेच पार्श्वभाग किंवा कंबरेखालचा अन् गुडघ्यांच्या वरील भाग) ते झूम करतील का?" असा सवाल मोनाने विचारले.

नक्की पाहा >> '..तर मी कानाखाली मारली असती'; कंगनाकडूनच मारहाणीचं समर्थन! इन्स्टा स्टोरी Viral

यापूर्वी अनेकांनी नोंदवलाय आक्षेप

अशाप्रकारे पापाराझींविरुद्ध बोलणारी मोना ही पहिली अभिनेत्री नाही. यापूर्वी अभिनेत्री जान्हवी कपूरने फोटोग्राफर्सला कॅमेरासमोर, 'चुकीच्या अँगलने माझे फोटो काढू नका' असं बजावलं आहे. अनेकदा आपण फोटोग्राफर्सला जीमच्या टाइट कपड्यांमध्ये माझे फोटो काढू नका असं सांगूनही ते ऐकत नाहीत, अशी तक्रार जान्हवीने केलेली. अभिनेत्री मृणाल ठाकूरनेही एका कार्यक्रमामध्ये पापाराझींना पाठमोरा फोटो देण्यास नकार दिला होता. अभिनेत्री पलक तिवारी, नायरा बॅनर्जी आणि इतरांनीही अशाप्रकारे त्यांचे मागून फोटो काढण्यावर उघडपणे आक्षेप घेतला आहे.