श्वेता तिवारी पुन्हा प्रेमात

श्वेताचं वैवाहिक जीवन नेहमीच वादग्रस्त राहिलं आहे.   

Updated: Jan 4, 2020, 10:47 PM IST
श्वेता तिवारी पुन्हा प्रेमात title=

मुंबई : 'कसोटी जिंदगी की' या मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. श्वेताचं वैवाहिक जीवन नेहमीच वादग्रस्त राहिलं आहे. श्वेता दोन वेळा विवाह बंधनात अडकली पण तिचे दोन्ही विवाह फार काळ टिकले नाहीत. आता ती तिसऱ्या प्रेमात अडकल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. तिने तिच्या आयुष्यात आलेल्या सर्व समस्यांचा सामना केला. तसेच ती तिच्या दोन्ही मुलांना एकटी सांभाळत आहे. 

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिला तू सध्या कोणात्या प्रेमात आहेस असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिने आपल्या तिसऱ्या प्रेमाचा खुलासा केला. 'मी सुरूवातीपासून माझ्या दोन मुलांच्या प्रेमात आहे. आता मला दुसऱ्या कोणाची गजर नसल्याचे तिने या वेळेस सांगितले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Good night selfies etherealgirl @palaktiwarii

A post shared by Shweta Tiwari (shweta.tiwari) on

मला माझ्या दोन मुलांवर प्रचंड प्रेम आहे त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त मला आता तिसऱ्या व्यक्तीची गरज वाटत नसल्याचे देखील तिने यावेळेस सांगितले. शिवाय ती तिच्या दोन मुलांसोबत खूप खूश आहे. 

श्वेता एकता कपूर प्रोडक्शनच्या माध्यमातून 'हम तुम और देम' नावाच्या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस आली होती. वेबसीरिजची कथा श्वेताच्या विवाहबाह्य संबंधांभोवती फिरताना दिसत होती. अभिनेता अक्षय ओबेरॉयने तिच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेला न्याय दिले होते. सीरिजमध्ये तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना आश्चर्यचकित करणारा आहे. 

सीरिजमध्ये तिच्या मुलीला आपल्या आईचे एका अनोळख्या इसमासोबत असलेले संबंध मान्य नसतात. त्यामुळे श्वेतावर मुलगी नाहीतर बॉयफ्रेंड यांपैकी एकाला निवडण्याचा प्रसंग ओढावलेचं दाखवण्यात आलं आहे.