कुशल पंजाबीची वडिलांसोबत शेवटची भेट

२७ डिसेंबर रोजी संपवला जीवन प्रवास  

Updated: Jan 4, 2020, 06:16 PM IST
कुशल पंजाबीची वडिलांसोबत शेवटची भेट  title=

मुंबई : अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्याच्या आशा अचानक जाण्यामुळे कलाविश्वाला मोठ्या धक्का बसला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये त्याने माझ्या मृत्यूसाठी कोणही जबाबदार नसल्याचे सांगितले होते. मृत्यूपूर्वी त्याने वडिलांसोबत भोजन देखील केले होते. त्यावेळी कुशल असं टोकाचं पाऊल उचलेल याची चाहूल त्याच्या वडिलांना बिलकूल लागली नव्हती.

कुशलच्या आत्महत्येपूर्वी आम्ही दोघांनी एकत्र भोजन केले त्याचप्रमाणे ड्रिंक सुद्धा केली असल्याचे वडिल चेतन यांनी सांगितले होते. या भेटीदरम्यान दोघांमध्ये इतर विषयांवर गप्पा झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुशलच्या मित्राने तो रूमचा दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. 

त्यानंतर बनावट किल्लीच्या मदतीने रूमचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा कुशल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याने आत्महत्ये पूर्वी त्याच्या मुलासोबत एक फोटो पोस्ट केला होता. ही पोस्ट केल्यानंतर पुढच्या काही तासांनी त्याच्या आत्महत्येची बातमी समोर आली. ज्यामुळे अनेकांच्या काळजात चर्रsss झालं. कुशलच्या निधनानंतर अनेकांनीच हळहल व्यक्त केली. 

 
 
 
 

 
 
 

कुशलचं वैवाहिक जीवनात अनेक अडचणी असल्यामुळे तो नेहमी ताणतणाव, नैराश्य अवस्थेत असायचा असे वक्तव्य त्याचा मित्र चेतन हंसराजने केले आहे. त्यामुळे कुशलची पत्नी आणि मुलगा फ्रांसमध्ये वेगळे राहत होते. 

महत्त्वाचं म्हणजे, कुशलने त्याचा संपत्तीचा अर्धा वाटा पालकांच्या नावावर तर अर्धा वाटा मुलाच्या नावावर केला आहे. सतत मानसिक स्वास्थ्य, ताणतणाव, नैराश्य याचे मानवी मनावर, जीवनावर आणि विचारांवर होणारे परिणाम आणि त्यातून घेतले जाणारे टोकाचे निर्णय या मुद्द्यांवरही चिंता व्यक्त केली गेली.