7 वर्षाच्या मुलासोबत प्रसिद्ध अभिनेत्रीचं भयानक कृत्य

सोशल मीडियावर काहीही शेअर करणं तुमच्या अडचणी वाढवू शकतं.

Updated: Dec 6, 2021, 06:46 PM IST
7 वर्षाच्या मुलासोबत प्रसिद्ध अभिनेत्रीचं भयानक कृत्य title=

मुंबई : सोशल मीडियावर काहीही शेअर करणं तुमच्या अडचणी वाढवू शकतं.असाच काहीसा प्रकार पश्चिम आफ्रिकेतील घाना येथील एका अभिनेत्रीसोबत घडला आहे. अभिनेत्रीने तिच्या 7 वर्षाच्या मुलासोबतचा न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने खळबळ उडाली. या फोटोमुळे अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून निकालही आला आहे. न्यायालयाने या अभिनेत्रीला ९० दिवस तुरुंगात राहण्याची शिक्षा सुनावली आहे.

वाढदिवसाच्या दिवशी मुलासोबत न्यूड फोटो काढला होता
या अभिनेत्रीचं नाव अकुआपेम पोलो आहे. जिला काही लोकं रोसामुंड ब्राउन नावाने देखील ओळखतात. रोसामुंड ही सिंगल मदर आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त तिने आपल्या मुलासोबत न्यूड फोटोसाठी पोज दिली होती. या फोटोत रोसामुंडने काहीही परिधान केलं नव्हते आणि तिच्या 7 वर्षाच्या मुलाने फक्त अंजरवेअर परिधान केलेली दिसतेय. हे संपूर्ण प्रकरण २०२० सालचं आहे.

न्यूड फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे
रोसामुंड ब्राऊनच्या मुलासोबतच्या न्यूड फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. यानंतर सगळेचजण या विचारात पडले होते की, या अभिनेत्रीने आपल्या ७ वर्षाच्या मुलासोबत असे फोटो कसे काढले?

 

जज म्हणाले - मुलाच्या गोपनीयतेची काळजी घेतली नाही
'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या संपूर्ण प्रकरणावर न्यायाधीश क्रिस्टीना क्रेन म्हणाल्या की, सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर करण्याचं प्रकरण त्रासदायक आहे. यासोबतच त्यांनी अनेक प्रश्नही विचारले. जजने प्रश्न विचारत म्हणाल्या,  या महिलेने फोटो पोस्ट करण्यापूर्वी आपल्या मुलाला विचारलं होतं का? काय तिने आपल्या मुलाच्या गोपनीयतेची काळजी घेतली होती का?