Samantha - Naga chaitanya मध्ये पुन्हा जवळीक; तो क्षण अखेर आलाच

नागा चैतन्य आणि समंथा असं का करताहेत हाच प्रश्न चाहत्यांनी विचारण्यास सुरुवात केली.   

Updated: Apr 6, 2022, 01:37 PM IST
Samantha - Naga chaitanya मध्ये पुन्हा जवळीक; तो क्षण अखेर आलाच  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिनं याच मार्गानं तिच्या घटस्फोटाची माहिती सर्वांना दिली. चाहत्यांना याची पूर्वकल्पना होती. पण, जेव्हा घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं तेव्हा मात्र, नागा चैतन्य आणि समंथा असं का करताहेत हाच प्रश्न चाहत्यांनी विचारण्यास सुरुवात केली. (Samantha - Naga chaitanya )

चार वर्षांच्या नात्यात मीठाचा खडा पडला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं. झालं. तिथे नागा चैतन्य आणि इथे समंथा आपआपलं आयुष्य जगत राहिले. वाद आणि भावनिक कोलाहलापासून त्यांनी स्वत:ला शक्य तितकं दूर ठेवलं. 

पण, नात्यांची ही वीण इतकी सैल मुळातच नव्हती हेच समंथानं नुकतीच केलेली सोशल मीडिया पोस्ट पाहून लक्षात येत आहे. 

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच तिनं त्याचा एक फोटो शेअर केला आहे. नागा चैतन्य रागाच्या भरात नेमका कसा दिसत असेल, या प्रश्नाचं उत्तर समंथाच्या इन्स्टा पोस्टमधून मिळत आहे. 

हा फोटो आहे, तिच्या आणि नागाच्या MAJILI या चित्रपटाचा. चित्रपटाला 3 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं तिनं हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिची आणि त्याची केमिस्ट्रीसुद्धा पाहायला मिळत आहे. 

चित्रपटाच्या निमित्तानं का असेना, समंथा आणि नागा चैतन्य या दोघांनाही अनेक दिवसांनी असं एका दुव्यानं जोडलं गेल्याचं पाहायला मिळालं. 

समंथानं नागा चैतन्यचा फोटो शेअर करणं चाहत्यांना धक्का देऊन गेलं. नात्यामध्ये दुरावा असला तरीही हे बंध काही केल्या तुटलेले नाहीत अशाच प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.