Amitabh Bachchan घरी नसताना पत्नी जया यांनी रेखाला जेवायला बोलावलं आणि...

जया बच्चन या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यामुळे असा क्वचितच कोणी असेल, जो जया बच्चन यांना ओळखत नसेल.

Updated: Feb 20, 2022, 05:34 PM IST
Amitabh Bachchan घरी नसताना पत्नी जया यांनी रेखाला जेवायला बोलावलं आणि...  title=

मुंबई : जया बच्चन या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यामुळे असा क्वचितच कोणी असेल, जो जया बच्चन यांना ओळखत नसेल. जया बच्चन यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि सर्व तरुणींच्या मनात घर बनवलेल्या अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केलं. ज्यामुळे अनेक तरुणींची मनं तुटली. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही त्या आनंदी जीवन जगत आहेत.

परंतु असे म्हणतात की, त्यांच्यावर एक वेळ अशी आली होती की, अमिताभ बच्चन त्यांच्या पत्नी जया बच्चनपासून वेगळे होणार होते. कारण त्यांच्या आयुष्यात कोणीतरी दुसरी व्यक्ती आली होती.

अमिताभ आणि जया बच्चन यांच्यात बॉलीवूड अभिनेत्री रेखा आली होती, ज्यामुळे त्यांचे नाते तुटणार होतं. हे पाहून जया बच्चन यांनी रेखाला आपल्या घरी जेवायला बोलावले आणि नंतर अशी गोष्ट सांगितली की, त्यानंतर रेखालाच त्यांच्यापासून वेगळं व्हावं लागलं होतं. 

एवढेच काय तर जया बच्चन यांनी रेखाला आपल्या घरी तेव्हा जेवायला बोलावले, जेव्हा अमिताभ बच्चन मुंबईबाहेर गेले होते.

अलीकडेच जया बच्चन आणि  रेखा यांच्यातील एक किस्सा समोर आला आहे, जो खुद्द रेखानेच सांगितला आहे.

रेखा जया बच्चन यांच्या घरी पोहोचताच जया यांनी त्यांचे आदरातिथ्य केलं आणि त्यांच्याशी खूप बोलले, तोपर्यंत सर्व काही ठीक चाललं होते, पण शेवटी जया बच्चन यांनी रेखाला घरातून निघाल्यानंतर असं काही सांगितलं, जे ऐकून रेखाला आश्चर्य वाटलं आणि त्या दिवसापासून रेखा अमिताभ बच्चन यांच्यापासून कायमच्या दुरावल्या. ज्यामुळे जया आणि अमिताभ बच्चन यांचं नातं टिकून राहिलं.

रेखाने सांगितले की, जेव्हा जया बच्चन यांनी त्यांना जेवायला बोलावले तेव्हा शेवटी घरी जाताना जया त्यांना म्हणाल्या, "अमिताभ फक्त माझे आहेत आणि मी (जया बच्चन) अमिताभपासून कधीही दूर जाणार नाही."

जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकल्यानंतर रेखा यांना समजले की त्यांच्या आणि अमिताभच्या नात्याला आता भविष्य नाही. हा विचार करून रेखाने अमिताभ बच्चनपासून दुर राहाण्याचे ठरवले. 

परंतु असं असलं तरी आजही रेखा आणि अमिताभ यांच्या प्रेमकथा चर्चेत आहेत.