इचार काय हाय तुमचा..? प्राजक्ता माळीने कुणाला दिला इशारा

 अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्राजक्ता माळीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या अदांनी तिच्या चाहत्यांना घायाळ करते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्राजक्ता नेहमीच तिच्या सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

Updated: Sep 12, 2023, 05:15 PM IST
इचार काय हाय तुमचा..? प्राजक्ता माळीने कुणाला दिला इशारा title=

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्राजक्ता माळीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या अदांनी तिच्या चाहत्यांना घायाळ करते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्राजक्ता नेहमीच तिच्या सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक फोटोवर प्रेमाचा वर्षाव करतात. नुकताच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

या फोटोत प्राजक्ता नेहमी प्रमाणे सोज्वळ दिसत आहे. प्राजक्ताचा साडीतील लूक तिचं सौंदर्य आणखीनच वाढवत आहे. प्राजक्ताने तिच्या या फोटोत पैठणी नेसली आहे. जी भगव्या रंगाची आहे. याचबरोबर तिने या साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. याचबरोबर तिने दागदागिने घातले आहेत. हे फोटो शेअर करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये 'डोळं रोखून असं काय बघता हो पावणं… इचार काय हाय तूमचा..?' असं कॅप्शन दिलं आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट्स करत तिचं कौतूक केलं आहे.

अनेकांनी तिच्या लूकवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका युजरने कमेंट करत लिहीलं की, इचार काय नाही ओ आमचा फक्त कर्जत च फार्म हाऊस फिरवून आणा बस तर अजून एकाने म्हटलंय, का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो. तर अजून एकाने लिहीलंय, रोखून नजरेतून तिर मारता तुम्हीच.. तर अजून एकाने लिहीलंय, निस्ता बघत बसावं असं वाटतंय तर अजून एकजण म्हणाला, लग्नाचा इचार हाय.तर अजून एकाने लिहीलंय, खरंच अस्सल शंभर नंबरी सौंदर्य. तर अजून एकाने म्हटलंय, ईचार खुप मोठा आहे पण जाउद्या आता काय सांगु. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते तिच्या या फोटोवर करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. तिचे फोटो आणि व्हिडीओ हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. दरम्यान, प्राजक्तानं काही दिवसांपूर्वीच एक फार्महाऊस खरेदी केले. त्याचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये डोगर परिसरात असलेलं तिचं हे फार्महाऊस दिसत आहे. तर हे फोटो शेअर करत स्वप्न साकार असं म्हटलं होतं.