किरण खेर यांनी खरेदी केली नवीन कार, किंमत पाहून व्हाल थक्क

  आता किरण खेर यांनी नवीन कार खरेदी केली आहे. त्याचे फोटोही समोर आले आहे. 

Updated: Mar 14, 2024, 07:29 PM IST
किरण खेर यांनी खरेदी केली नवीन कार, किंमत पाहून व्हाल थक्क title=

Kirron Kher New Luxury Car : बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं खास स्थान निर्माण केले आहे. किरण खेर या कायमच त्यांच्या स्टाईलमुळे आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. गेल्या बऱ्याच काळापासून त्या सिनेसृष्टीपासून दूर आहेत. पण त्यांचा चाहतावर्ग फार मोठा आहे. आता किरण खेर यांनी नवीन कार खरेदी केली आहे. त्याचे फोटोही समोर आले आहे. 

किरण खेर या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. आता नुकतंच किरण खेर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत किरण खेर या काळ्या रंगाचा हुडी, जिन्स, सनग्लासेस अशा हटके लूकमध्ये दिसत आहेत. यावेळी त्यांच्या हातात नव्या कारची चावी पाहायला मिळत आहे. त्यासोबत त्यांच्या नवीन कारची झलकही यात दिसत आहे. 

किरण खेर यांच्या गाडीची किंमत किती?

किरण खेर यांनी GLS मर्सिडीज ही कार खरेदी केली आहे. त्यांच्या नव्या कोरी मर्सिडीज कारचा रंग सिल्वर आहे. या गाडीची किंमत तब्बल 1.65 कोटी रुपये आहे. किरण खेर यांच्याआधी GLS मर्सिडीज ही कार अनेक बॉलिवूड कलाकारांनी खरेदी केली आहे. सध्या किरण खेर यांना अनेक बॉलिवूड कलाकार आणि त्यांचे चाहते शुभेच्छा देताना दिसत आहेत. 

दरम्यान किरण खेर या चंदीगडच्या खासदार आहेत. त्या राजकारणात सक्रीय झाल्यापासून सिनेसृष्टीपासून दूर झाल्या. सध्या त्या फक्त काही रिअॅलिटी शोमध्येच झळकताना दिसतात. किरण खेर यांना 2021 मध्ये रक्ताचा कर्करोग झाला होता. या संदर्भात त्यांचे पती आणि अभिनेते अनुपम खेर आणि मुलगा सिकंदर खेर यांनी माहिती दिली होती. आता त्या अगदी निरोगी आहेत. 

आणखी वाचा : दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची राजकारणात एंट्री, 'या' मतदारसंघातून लढणार निवडणूक

कॅन्सरशी लढाई जिंकल्यानंतर किरण खेर 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसल्या होत्या . अनुपम खेर आणि किरण खेर 1985 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. अनुपम यांच्या आधी किरणचे लग्न उद्योगपती गौतम बेरीसोबत झाले होते.