अरे देवा! Nora Fatehi दुबईला गेली आणि गायब झाली...

सध्या नोरा दुबईमध्य़े सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. पण, आता मुद्दा असा की ती खरंच दुबईमध्ये गायब झालीये का?   

Updated: Feb 4, 2022, 04:56 PM IST
अरे देवा! Nora Fatehi दुबईला गेली आणि गायब झाली...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : आपल्या दमदार आणि तितक्याच घायाळ करणाऱ्या नृत्याने अभिनेत्री नोरा फतेही हिनं आजवर अनेकांची मनं जिंकली आहेत. फार कमी वेळात नोरानं तिचा मोठा चाहतावर्गही निर्माण केला आहे. पण आता याच चाहत्यांसाठी एक अनपेक्षित आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Nora Fatehi )

जबरदस्त फॅन फॉलोइंग असणाऱ्या नोरानं चाहत्यांपासून दुरावा पत्करला आहे. एकाएकी तिनं आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केलं आहे. 

नोराच्या नावानं सर्च केल्यास तिचे अनेक फॅन पेज दिसतात पण, तिचं अधिकृत इन्स्टापेज मात्र दिसत नाही. 

काही तासांपूर्वीच दुबईतील सुट्ट्यांदरम्यानचे फोटो पोस्ट करणाऱ्या नोराने एकाएकी हा निर्णय़ का घेतला हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार सध्या नोरा दुबईमध्य़े सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. पण, आता मुद्दा असा की ती खरंच दुबईमध्ये गायब झालीये का? 

काही दिवसांपूर्वी कोरोनातून सावरल्यानंतर आता तिनं पुन्हा एकदा कामावर लक्ष देण्यास सुरुवात केली होती. त्यातच वेळ काढून ती दुबईलाही गेली. 

आता मात्र यापेक्षा जास्त माहिती कोणालाच नसल्यामुळं काहींनी नोरासाठी चिंताही व्यक्त केली आहे.