कुटुंबासमवेत पाहताही येणार नाही असा बोल्ड सीन साकारणारी 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण?

साहित्य क्षेत्रातील पदवीधारक 

Updated: Dec 30, 2021, 03:15 PM IST
कुटुंबासमवेत पाहताही येणार नाही असा बोल्ड सीन साकारणारी 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कथानकाची गरज म्हणून काही चित्रपटांमध्ये इंटिमेट कंवा बोल्ड सीन, प्रणयदृश्य साकारली जातात. हिंदी कलाविश्वात काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी आजवर अशा भूमिका, त्याहूनही अशी दृश्य अतिशय प्रभावीपणे साकारली आहेत. पण, असं करणाऱ्या याच अभिनेत्री यशाचं परमोच्च शिखर मात्र गाठू शकल्या नाहीत. 

अशाच अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे नंदना सेन. बोल्डसीन साकारण्यापासून ती कधीच मागे हटली नाही. 

तिचा चित्रपट फारसा चालला नाही, पण त्याची चर्चा मात्र बरीच झाली. 

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रंगरसिया' या चित्रपटातून नंदनानं रणदीप हुड्डाशी स्क्रीन शेअर केली होती. तिचा हा चित्रपट फारसा चालला नाही. ज्यानंतर नंदनानं कलाजगतापासून दूरावा पत्करला. 

1997 पासूनच तिनं 'द डॉल' या चित्रपटापासून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. अजय देवगनसह ती 'टँगो चार्ली'मध्येही झळकली होती. पण, तिची चर्चा झाली ती म्हणजे 'रंगरसिया'मुळं. 

एका चित्रकारासाठीच्या प्रेरणेची भूमिका तिनं या चित्रपटामध्ये साकारली होती. जिची चित्र काढून चित्रकार प्रसिद्ध होतो.

चित्रपटात नंदनानं काही बोल्ड दृश्य साकारली होती. जी सहसा कुटुंबासमवेत पाहताना असहजता जाणवू शकते. 

असं म्हणतात की, बोल्ड दृश्यांमुळंच हा चित्रपट बराच काळ सेन्सॉरच्या कचाट्यातही अडकला होता. 

कैमरे के सामने इस एक्ट्रेस ने हदें की पार, परिवार संग बैठ नहीं देख सकते एक भी सीन!

नंदनानं सांगितल्यानुसार या चित्रपटाचं कथानक ऐकवलं त्यावेळी तिचे आई-वडिलही तिथेच होते. प्रदीर्घ चर्चेनंतर त्यांनी चित्रपटासाठी होकार दिला होता. 

नंदनानं हार्वर्ड विद्यापीठातून साहित्याची पदवी घेतली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेसाठीही तिनं काम केलं होतं.