मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता अभिनेता शाहिद कपूरची अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. मृणालने सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. त्यामुळे आता चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
मृणालने तिच्या इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये मृणालने लिहिलं, 'मी कोविड पॉझिटिव्ह आहे. माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मी स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. मी डॉक्टर आणि आरोग्य प्रोफेशनल्स यांनी सांगितलेल्या प्रोटोकॉलचे पालन करत आहे.'
मृणाल पुढे म्हणाली, 'जर कोणी माझ्या संपर्कात आले असेल तर त्यांनी कृपया स्वतःची कोरोना चाचणी करा.' असं आवाहन देखील तिने चाहत्यांना केलं आहे. सांगायचं झालं तर मृणाल ठाकूर काही दिवसांपासून शाहिद कपूरसोबत त्याच्या 'जर्सी' या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.
काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरसह अंशुला, रिया कपूर आणि तिचा पती करण बुलानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या सर्वजण क्वारंटाईनमध्ये असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. अर्जुन कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मलायका अरोराची देखील कोविड चाचणी करण्यात आला, मात्र तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.