मराठमोळ्या अभिनेत्रीने लॉन्च केला हटके कपड्याचा ब्रँड

हटके क्लोथिंग ब्रँड लॉन्च

Updated: Aug 28, 2019, 08:58 PM IST
मराठमोळ्या अभिनेत्रीने लॉन्च केला हटके कपड्याचा ब्रँड title=

मुंबई : अभिनेत्री क्रांती रेडकरने अभिनयासोबतच आता आणखी एका क्षेत्रात पदार्पण केलं आहे. नुकताच, क्रांतीने तिचा स्वत:चा 'ZZ ZIYA ZYDA'हा क्लोथिंग ब्रँड लॉन्च केला आहे. क्रांतीने तिच्या खास जवळच्या व्यक्ती आणि चित्रपटसृष्टीतील काही मित्र-परिवाराच्या उपस्थितीत क्लोथिंग ब्रँडचं लॉन्चिंग केलं.

 
 
 
 

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar) on

क्रांती तिच्या नव्या कल्पना, योजना समजून घेतल्या जातील अशा एका नव्या संधीच्या शोधात होती. दरम्यान तिची भेट अक्षय बर्दापूरकर आणि 'प्लॅनेट टॅलेंट'शी झाली. 'प्लॅनेट टी'च्या माध्यमातून तिने तिच्यातील टॅलेंट म्हणजेच 'ZZ ZIYA ZYDA' हा नवा ब्रँड प्रेक्षकांसमोर आणला.

'ZZ झिया झायदा' या नावातही वेगळंपण, आकर्षण आहे. 'ZZ ZIYA ZYDA'च्या माध्यमातून क्रांतीची फॅशन स्टाईल, तिच्या क्लोथिंग ब्रँडमधलं वेगळं कलेक्शनही आता पाहायला मिळणार आहे.